Next
‘तरुणांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घ्यावा’
राम कांडगे यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या, पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे, प्राचार्या डॉ.मंजुश्री बोबडे व अन्य मान्यवर

औंध : ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांनी कर्मवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा’,असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या, पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे यांनी केले. संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

 ‘पुण्यामध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे करारानंतर, खेड्या-पाड्यातील, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे; तसेच शहरात राहता यावे, अशा हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पांडवनगर येथे युनियन बोर्ड आणि हॉस्टेलची स्थापना केली. तेव्हा कर्मवीर अण्णा स्वतः डोक्यावर रानमेवा घेऊन, युनियन बोर्डिंगच्या हॉस्टेलपर्यंत चालत येत असत. त्यामुळे अनेक गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली’,असे कांडगे यांनी सांगितले. 

या वेळी कांडगे यांच्या हस्ते अर्थशास्त्र, आय. टी आणि इंग्रजी विभागाने तयार केलेल्या स्मरणिकेचे आणि भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे  म्हणाल्या, ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या छायेत अनेक वंचित मुले-मुली शिक्षण घेत आहेत. अनेक मुले-मुली युनियन बोर्डिंगमधे राहून;तसेच ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांनी कर्मवीर अण्णांच्या विचाराने वाटचाल करावी.’

या कार्यक्रमाला पश्चिम विभागाचे अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, मुख्याध्यापक जाधव, रयत बँकेचे शाखाधिकारी अल्हाट, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,  डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. तानाजी हातेकर,  प्रा. एकनाथ झावरे,  डॉ. संजय नगरकर, डॉ. सविता पाटील,  डॉ. अतुल चौरे  यांच्यासह अन्य  प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search