Next
‘एनर्जी स्टोरेज लॅब ही ‘इन्क्युबेशन’ची महत्त्वाची प्रयोगशाळा’
पुणे विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, October 27, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘विद्यापीठात उभारण्यात आलेली ‘एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजी लॅब’ ही आमच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’चीच सुरूवात आहे. त्याअंतर्गत सुरू करण्यात येणारी पहिली महत्त्वाची प्रयोगशाळा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

विद्यापीठाच्या आंतरशास्त्र ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागातर्फे उभारण्यात आलेल्या ‘एक्साइड– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेंटर ऑफ एक्सलन्स इन एनर्जी स्टोरेज’ या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रो. करमळकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

‘एक्साइड’ कंपनीने ही ‘एनर्जी स्टोरेश टेक्नॉलॉजी’ प्रयोगशाळा उभारण्यासाठी, तसेच संशोधनासाठी लागणारी वैज्ञानिक उपकरणे खरेदी करण्यासाठी सीएसआरअंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार त्याची उभारणी करण्यात आली आहे. या उद्घाटन समारंभाला ‘एक्साइड’चे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट जितेंद्र कुमार, चिंचवड प्रकल्पाचे चीफ ऑपरेशन मॅनेजर के. अनिरुद्ध, सीएसआरच्या प्रमुख शाश्वती बोस, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम, आंतरशास्त्र ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदेश जाडकर आदी उपस्थित होते.या प्रयोगशाळेचे महत्त्व विशद करताना कुलगरू म्हणाले, ‘आपण विजेवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी’कडे वाटचाल करत आहोत. अशा वेळी ऊर्जा साठवण क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज निर्माण होऊ शकते; मात्र ती रात्री वापरण्यासाठी बॅटरी व स्टोरेज करण्याची व्यवस्था आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘एनर्जी स्टोरेज’कडे आधी लक्ष द्यायला हवे. विद्यापीठात सुरू होणारी ही प्रयोगशाळा त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जितेंद्र कुमार म्हणाले, ‘प्रशिक्षित कर्मचारी असणे ही ‘एक्साइड’ची गरज आहे. त्यामुळे आम्ही या प्रयोगशाळेकडे अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निर्मिती करणारे केंद्र म्हणून पाहत आहोत. यातून विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.’

‘एक्साइड’तर्फे देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे शैक्षणिक संस्थेशी एकत्र काम करण्याचा पुढाकार घेण्यात आल्याचे शाश्वती बोस यांनी सांगितले.

विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदेश जाडकर यांनी सर्वांचे स्वागत करून ही प्रयोगशाळा उभी करण्यामागची भूमिका मांडली. या विभागात काही प्रमाणपत्र कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, दोन वर्षांचा एमटेक (एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजी) हे अभ्यासक्रम येत्या काळात सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

विभागाचे गेस्ट लेक्चरर डॉ. राजर्षी सेन यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनघा पाठक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आदिनाथ फुंदे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search