Next
हिमायतनगर जिल्हा परिषद उर्दू शाळेत विज्ञान प्रदर्शन
नागेश शिंदे
Tuesday, January 22, 2019 | 11:15 AM
15 0 0
Share this storyहिमायतनगर : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत २१ जानेवारी २०१९ रोजी विज्ञान प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, सदाशिव सातव, सावन डाके, नगरसेवक विनायक मेंडके, रायेवार सर जलील सर, नयम भाई, मो.जाहेद खासीमी, बड्डेसाहब, शेख सर, फेरोज खान पठाण, पत्रकार सोपान बोंपिलवार, डॉ. जहूर, महाराष्ट्र जनकल्याण कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष अब्दुल हफिज, शेख जबी, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरदार खान पठाण उपस्थित होते.ही शाळा नांदेड जिल्ह्यातील एकमेव डिजिटल शाळा असून, मान्यवरांनी प्रदर्शनादरम्यान विद्यार्थांना नवनवीन प्रयोगाची विचारणा केली. प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. असद यांनी काम पाहिले. अब्दुल जलील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री. अथर, श्री. इम्रान, श्री. तयब, श्री. फिरासद, शमीमुन्नीसा बेगम, नसरीन बेगम आदींसह सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरदार खान पठाण यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vinayak mendke About 32 Days ago
Nice
0
0

Select Language
Share Link