Next
सिंधुदुर्गातील संगीत कलाकारांनी माहिती पाठविण्याचे आवाहन
BOI
Saturday, June 08, 2019 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायन आणि वादन क्षेत्रातील सर्व कलाकारांची सूची ‘स्वरसिंधुरत्न’तर्फे तयार केली जाणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातील कलाकारांबरोबरच मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतरत्र राहणाऱ्या कलाकारांनीही ३० जून २०१९पर्यंत आपली माहिती पाठवावी, असे आवाहन ‘स्वरसिंधुरत्न’तर्फे करण्यात आले आहे.

माहिती देताना कलाकाराचे संपूर्ण नाव, कलाप्रकार, तालुका, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, तालुक्यापासून गावाचे अंतर, फोन आणि व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर, घरचा फोन नंबर, ई-मेल आयडी, सध्या राहत असलेले ठिकाण, गुरूचे नाव, संगीत क्षेत्रातील घराणे, संगीत शिक्षण किती वर्षे घेतले, वादक कलाकारांनी आतापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध गायकांना साथ केली, मिळालेल्या पुरस्कारांची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे, विशेष कार्यक्रमाचे स्थळ, कोणत्या संस्थेतर्फे विशेष कार्यक्रम केले आदी तपशील पाठवायचा आहे.

अर्जासाठी आणि अधिक माहितीसाठी पत्ता : प्रशांत प्रभाकर धोंड, २२७५, प्रभाकर, मु. पो. शंकरवाडी (नवीवाडी), पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६५२८
संपर्क क्रमांक : (०२३६२) २२२१६१, ९४२३३०९४३२  
ई-मेल : dhondprashantp11@gmail.com 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search