Next
‘बीएमडब्ल्यू’तर्फे मदुराई येथे ‘केयूएन’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, January 19, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

तामिळनाडू : बीएमडब्ल्यू इंडियाने नवीन फुली-फ्लेज्‍ड (फोरएस) डिलरशीप केयुएन एक्‍सक्‍लुसिव्‍हच्‍या उद्घाटनाची घोषणा मदुराई येथे केली आहे.

नवीन केयुएन एक्‍सक्‍लुसिव्‍ह केंद्र हे मदुराईमधील सर्वात मोठ्या प्रिमिअम ऑटोमोबाइल डिलरशीप्‍सपैकी एक आहे. वासंती भूपती या डिलरशीपलाचे नेतृत्‍व करत असून, हे केंद्र विरुद्धूनगर मेन रोड, थॉपूर व्हिलेज, साऊथ मदुराई येथे आहे.

‘बीएमडब्ल्यू ग्रुप’चे प्रेसिडेंट विक्रम पवाह म्‍हणाले, ‘बीएमडब्ल्यू कंपनी फक्‍त आपल्‍या आकर्षक उत्‍पादने व सेवांच्‍या माध्‍यमातूनच नव्‍हे, तर वर्ल्‍ड-क्‍लास डिलरशीप नेटवर्कच्‍या माध्‍यमातून देखील अग्रस्‍थानी आहे. यामुळेच आमच्‍या डिलरशिपमधील ग्राहक अनुभव वाढवण्‍यासाठी उपक्रम व टूल्‍सची व्‍यापक रेंज तयार करण्‍यात आली आहे. मदुराईमधील केयुएन एक्‍सक्‍लुसिव्‍हच्‍या उद्घाटनासह आम्‍ही आमच्‍या ब्रँडसाठी नवीन इर्मसिव्‍ह ग्राहक संपर्क केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्‍ये आमच्‍या ग्राहकांना वैयक्तिक, भावनिक व प्रिमिअम ब्रँड अनुभव मिळेल.’

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘३६ हजार ५५२ स्क्वेअर फुटाहून अधिक जागेवर पसरलेली केयुएन एक्‍सक्‍लुसिव्‍ह मदुराईची अल्‍ट्रा-मॉडर्न फॅसिलिटी ग्राहकांना विक्रीपूर्व व विक्रीपश्‍चात्‍त सर्वोत्‍तम सेल्‍स ओनरशिप अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी सेल्‍स, सर्विस, स्‍पेअर-पार्टस् व बिझनेस सिस्‍टम्‍स या सर्व प्रक्रियांमध्‍ये उच्‍च दर्जा देते. डिलरशीपमध्‍ये बीएमडब्ल्यू प्रिमिअम सेलेक्‍शन सुद्धा आहे, जे काळजीपूर्वक निवडलेल्‍या आणि दर्जासंदर्भात व्‍यापक तपासणी करण्‍यात आलेल्‍या प्री-ओन्‍ड बीएमडब्ल्यू वाहनांची व्‍यापक रेंज देते.’

केयुएन एक्‍सक्‍लुसिव्‍हच्‍या डिलर प्रिन्सिपल वासंती भूपती म्‍हणाल्‍या, ‘दहा वर्षांपूर्वी बीएमडब्ल्यू इंडियासोबतची आमची भागीदारी सुरू झाली आणि या सहयोगातून मिळालेल्‍या यशाबाबत आम्‍हाला अभिमान आहे. मदुराईमधील नवीन डिलरशीप प्रत्‍येक बीएमडब्ल्यूमध्‍ये असलेला ‘शीअर ड्रायव्हिंग प्‍लेजर’शी संबंधित सर्वोत्‍तम आरामदायी अनुभव देण्‍याचा आमचा वारसा सुरूच ठेवेल. आम्‍ही बीएमडब्ल्यू इंडियासोबतच्‍या आमच्‍या सहयोगाप्रती पूर्णत: कटिबद्ध आहोत. आम्‍ही मदुराईमधील आमच्‍या ग्राहकांना उच्‍च दर्जाची सेवा देण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search