Next
‘रन फॉर बेटी बचाओ अभियाना’ला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, November 29 | 06:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियान’ सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ‘रन मुंबई ते पुणे’ आयोजित केले  होते. यामध्ये १० प्रशिक्षित महिला मुंबई ते पुणे रन (दौड) अनेक विषयांचे संदेश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

अभियान प्रदेश सदस्य डॉ. राजू राम यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची जनजागृती आपल्या प्रदेशाद्वारे व्हावी यासाठी विनंती प्रस्ताव केला होता. हा प्रस्ताव मान्य करून २४ ते ६८ वयोगटातील १० महिला यात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सुरजीत कौर (६८), सुनिता मुंडे (५२), मंजिरी जोशी (४८), श्रीदेवी पौडवाल (४७), संध्या ओक (४७), योगिता शहा भौमिक (४७), भारती जोशी (४५) राखी रास्ते (४३), मंजित कौर (३७) यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला २२ नोव्हेंबर पहाटे चार वाजता दादर सिद्धिविनायक येथून सुरुवात झाली. प्रदेश सदस्य व कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राम यांनी प्रोत्साहन दिले. या वेळी प्रदेश सदस्य अंजना थडानी, दीपिका अरोरा व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता २४ नोव्हेंबरला संध्याकाळी पुणे येथे दगडूशेठ गणपती येथे झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके व प्रदेश संयोजक शामभाऊ सातपुते यांनी दिल्या.

कार्यक्रमाची संकल्पना, व्यवस्थापन, मार्गदर्शन प्रदेश सदस्य डॉ. राम यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. तसेच सपोर्ट टीम, सायकलिंग सपोर्ट आदी सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमास साहसी महिला रनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक नेते आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, यांनी धावपट्टू महिलांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. समारोपरासंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, अभियान प्रदेश संयोजक शामभाऊ सातपुते, प्रदेश सदस्य डॉ. राम यांसह जिल्हा पदाधिकारी, शहर भाजप पदाधिकारी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link