Next
भारतीयांचा डाटा कौशल्यावर सर्वाधिक विश्वास
प्रेस रिलीज
Monday, July 09, 2018 | 12:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डाटा विश्लेषणामधील अग्रणी ‘क्लिक’द्वारे जाहीर केलेल्या नवीन जागतिक संशोधनानुसार जगात भारतीय व्यावसायिक निर्णयकर्त्यांचा डाटा कौशल्यावर सर्वाधिक विश्वास (४६ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर अमेरिका (३३ टक्के), स्पेन (२७ टक्के), युके (२६ टक्के), ऑस्ट्रेलिया (२२ टक्के), जर्मनी (२० टक्के), सिंगापूर (१७ टक्के), फ्रांस (१६ टक्के), स्वीडन (१५ टक्के), चीन (१२ टक्के) आणि जापान (आठ टक्के) यांचा क्रमांक येतो.

डाटा कौशल्यांमध्ये शंकेची सर्वात जास्त पातळी युरोपिअन अधिकारी (८३ टक्के), आशिया-पॅसिफिक (८० टाके) आणि यूएस (६७ टक्के) यांच्यामध्ये आढळून आली. या जागतिक अहवालामध्ये ‘क्लिक’ने डाटा साक्षरतेवर प्रकाश टाकला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना डाटा, साधने आणि शिकवणीने सक्षम कसे करायचे याबद्दल व्यावहारिक सल्ला दिला आहे.

बहुतांश डाटा साक्षर व्यावसायिक निर्णयकर्त्यांच्या म्हणण्यानुसार (८५ टक्के) त्यांच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत ते खूपच चांगले काम करीत आहेत. डाटा साक्षरतेमुळे त्यांना कार्यस्थळी जास्त विश्वसनीयतासुद्धा (८२ टक्के) मिळते. बहुतांश व्यावसायिक निर्णयकर्ते (७८ टक्के) त्यांचे कौशल्य सुधारण्यास अधिक वेळ आणि ऊर्जा गुंतवण्यास इच्छुक असतील, जे कुठल्याही ठळक प्रतिरोधाशिवाय सांस्कृतिक बदल घडवून आणण्याचे प्रतिनिधित्व करतात. भारतातील अधिकाऱ्यांना शिकण्याची (९५ टक्के) सर्वात जास्त आकांक्षा आहे, त्यानंतर आशिया-पॅसिफिक (७२ टक्के) आणि शेवटी युरोपचा (६५ टक्के) क्रमांक येतो.

‘क्लिक’मधील डाटा साक्षरतेचे प्रमुख जॉर्डन मॉरो म्हणाले, ‘डाटा हा स्पर्धेचा नवीन आधार आहे, ज्यावर ज्ञान हस्तगत करण्यास व बाजारांवर अधिपत्य मिळवण्यास जागतिक कंपन्यांची मदार आहे; मात्र या डिजिटल युगात कंपनीची यशस्वी होण्याची क्षमता प्रामुख्याने तिच्या कर्मचाऱ्यांमध्ये नवीन भाषा शिकण्याची क्षमता किती आहे यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. ती भाषा आहे डाटाची भाषा. प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही आहे की व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्यांना डाटावर वर्चस्व मिळण्यास संघर्ष होत आहे. ज्यामुळे त्यांना फक्त स्वत:च्या नेतृत्वगुणांना पुरेसा वाव देता येत नाही आहे, तर संपूर्ण व्यवसायामध्ये डाटा आधारित सांस्कृतिक बदल घडवून आणता येत नाही आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link