Next
‘पार्ले’च्या ‘प्लॅटिना’ रेंजला बळकटी
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 02:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पार्ले प्रॉडक्ट्स या भारतातील अग्रेसर बिस्कीट व मिठाई उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी ‘प्लॅटिना’ ही आपली प्रीमियम शाखा सादर केली असून, आता या रेंजचे बाजारपेठेतील स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने कंपनीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘पार्ले’च्या पोर्टफोलिओतील प्रिमीयम उत्पादनांचा लाभ घेण्याची इच्छा बाळगणार्‍या ग्राहकांकडून गेल्या वर्षभरात ‘प्लॅटिना’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादातून प्रेरित होऊन, कंपनीच्या आकर्षक मिलानो रेंजमध्ये आता मिक्स्ड बेरीज सेंटर फिल्ड कुकीज आणि हॅझलनट सेंटर फिल्ड कुकीजची भर घालण्यात आली आहे.

२००६ साली बाजारात दाखल झाल्यापासून ‘प्लॅटिना’च्या ‘मिलानो’ या फ्लॅगशीप उत्पादनाला ग्राहकांनी दिलेल्या प्रेमाची पावती म्हणून ‘पार्ले’च्या सर्वांत प्रिमीयम अशा चॉकलेट चिप कुकींमध्ये नवीन व्हॅरियंट्सची भर घालण्यात आली आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने एककेंद्री दृष्टिकोन बाळगून आपली उत्पादने सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी म्हणून अनेक महत्त्वाच्या उत्पादक चेन्सशी भागीदारी केली आहे.

‘पार्ले प्लॅटिना’अंतर्गत मिलानो रेंजमध्ये वाढ करतानाच, येत्या ‘आयपीएल’ सिझनमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या साथीने या ‘एफएमसीजी’ क्षेत्रातल्या अग्रेसर कंपनीने दोन खास टीव्हीसी मोहिमांच्या माध्यमातून ही घोषणा अधिकृतरित्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विनोदी पार्श्वभूमीवर या व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण करण्यात आले असून, छोटीशी ‘मिलानो’ कुकी खाताना कुणालाही डाएटची आठवण येणार नाही, हा संदेश विनोदी पद्धतीने मांडण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link