Next
‘लैंगिकता निसर्गाने दिलेली देणगी’
बिंदुमाधव खिरे यांचे मत
BOI
Saturday, September 22, 2018 | 02:27 PM
15 0 0
Share this article:

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना ‘समपथिक ट्रस्ट’चे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे, समवेत विनय र. र.
पणे : ‘लैंगिकता ही निसर्गाने दिलेली देणगी असून, वैद्यकीय शास्त्रानुसार ती विकृती किंवा आजारही नाही. त्यामुळे सामाजिक दबाव किंवा शास्त्रीय उपचाराने त्याच्या मूळ स्वरूपात किंवा लैंगिक आणि लिंगभाव यामध्ये बदल करता येत नाही. भिन्न लिंगी स्त्री-पुरुष आणि समलैंगिक यांच्याकडे आपण सामाजिक एकोप्यानेच पहिले पाहिजे’, असे मत ‘समपथिक ट्रस्ट’चे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘लैंगिकता- वैज्ञानिक वास्तव आणि सामाजिक दृष्टीकोन’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह निश्चय म्हात्रे, अशोक तातुगडे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘इंडियन सायकियाट्रिक्स सोसायटी आणि जागतिक सायकियाट्रिक्स सोसायटी यांनीही लैंगिकता नैसर्गिक आणि विज्ञानाच्या आधारावर असल्याचे नमूद केले आहे. पालकांच्या किंवा संगतीच्या संस्काराचा कोणताही परिणाम लिंगभाव किंवा लैंगिक कल यावर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलमात सुधारणा केल्याने तृतीयपंथी, समलैंगिक यांना न्याय मिळाला आहे. साधारण १७ वर्षे आम्ही यासाठी लढा दिला. या निर्णयामुळे संविधानातील १४, १५ व २१ या कलमांतर्गत मानवी अधिकार जपले गेले आहेत. प्रौढ आणि संमतीने झालेल्या लैंगिक संबंधास मान्यता मिळणार आहे. यापुढे तृतीयपंथी आणि समलैंगिक लोकांचे सर्वेक्षण होऊन त्यांची गणती व्हायला हवी. त्यासाठी पुढील लोकसंख्या गणनेत त्याचा विचार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

विनय र. र. म्हणाले, ‘लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलणे अनेकदा असभ्य मानले जाते. लैंगिकता या विषयाबद्दल खरेखुरे आणि वास्तव ज्ञान समाजाला होण्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरेल. कायदे, रुढी, परंपरा, नियम लैंगिक अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे ठरले आहेत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे. कारण शिक्षा किंवा औषधाने लैंगिकता बदलता येत नाही.’

 निश्चय म्हात्रे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Shaikh A.A. About 361 Days ago
You can't change the truths,Nature has its won rules.Hermaphrodite is one of its creativity which servives on the surface of earth,weather you count or not ? Your attempt is good, God bless you for your attempt. Hope for your recognition. I feel. Thanks.
0
0
SANDEEP BHALCHANDRA SARAF About 361 Days ago
Excellent
0
0

Select Language
Share Link
 
Search