Next
रमेश म्हसकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
मिलिंद जाधव
Monday, September 09, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:भिवंडी :
२०१९-२०२०चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार रमेश म्हसकर यांना पाच सप्टेंबर २०१९ रोजी शिक्षक दिनी प्रदान करण्यात आला. ठाणे मो. ह. विद्यालयाच्या सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात म्हसकर यांना गौरविण्यात आले.

रमेश म्हसकर हे भिवंडी तालुक्यातील शिवनगर केंद्रातील जिल्हा परिषद वैजोळा मराठी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी २४ वर्षे सेवा दिली आहे. एक ज्ञानरचनावादी व उपक्रमशील शिक्षक, उत्तम वक्तृत्व व कर्तृत्व असलेले, विद्यार्थिप्रिय, ढोलकी व हार्मोनियमचे उत्तम वादक, हसतमुख व समाजप्रिय अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.‘एक उत्तम सोहळा अनुभवण्यास मिळाला. केलेल्या कार्याचे चीज झाले. पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली. नव्या उमेदीने काम करण्याची ऊर्मी, प्रेरणा मिळाली. माझा केलेला सन्मान अविस्मरणीय आहे,’ असे रमेश म्हसकर यांनी सांगितले.

या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समिती सभापती संगीता गांगड, महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, तसेच जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के आणि रवींद्र तरे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search