Next
सणासुदीला करा सुरक्षित ऑनलाइन खरेदी
क्विक हीलतर्फे टोटल सिक्युरिटी फेस्टिव्ह पॅक दाखल
प्रेस रिलीज
Friday, October 26, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

मुंबई  : क्विक हील या आघाडीच्या आयटी सिक्युरिटी सोल्युशन्स प्रदाता कंपनीने क्विक हील टोटल सिक्युरिटी फेस्टिव्ह पॅकची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना बिनधास्त ऑनलाइन खरेदीचा आनंद घेता येईल. यातील सेफ बँकिंग फीचरमुळे सायबर गुन्हेगारी किंवा मालवेअरचा धोका कमी होतो. 

सेफ बँकिंग व्यतिरिक्त पॅरेन्टल नियंत्रण, रॅन्समवेअर, मालवेअर रक्षण, डेटा चोरीपासून संरक्षण, फायरवॉल, पीसी ट्यूनर, अॅंटी-कीलॉगर अशी अनेक अत्याधुनिक सिक्युरिटी फीचर्स यामध्ये आहेत. यामुळे इंटरनेटवर बँकिंग, शॉपिंगसाठी सुरक्षित वातावरण मिळते. 

हा फेस्टिव्ह पॅक क्विक हीलच्या ग्राहकांना सणाच्या दिवशी कार्यान्वित केल्यास अतिरिक्त चार महिन्यांची वैधता विनामूल्य मिळणार आहे. या विशेष ऑफरचा लाभ दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्ष पूर्वसंध्येला घेता येईल.

याबाबत क्विक हील टेक्नॉलॉजीजचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर विजय म्हसकर म्हणाले, ‘आजकाल लोक शॉपिंग, बँकिंग, अभ्यास आणि सोशल मीडिया ब्राऊझिंगच्या निमित्ताने दिवसातून अनेकदा इंटरनेटचा वापर करत असतात. प्रत्येक वेळी ते लॉग ऑन करतात तेव्हा त्यांच्या वैयक्तिक तपशीलास सायबर धोका संभवतो. यासाठीच आम्ही क्विक हील टोटल सिक्युरिटी फेस्टिव्ह पॅक दाखल केला आहे. ही आजकालच्या इंटरनेट सॅव्ही, डिजिटल फर्स्ट जनरेशनसाठी एक सुयोग्य भेट ठरेल.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search