Next
‘रतन टाटांची भूमिका करण्याची इच्छा नेहमीच होती’
‘पीएम नरेंद्र मोदीं’च्या बायोपिकमध्ये बोमन इराणी दिसणार रतन टाटांच्या भूमिकेत
BOI
Thursday, February 21, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकमध्ये अभिनेते बोमन इराणी हे उद्योगपती रतन टाटा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘या भूमिकेसाठी मी नेहमीच इच्छुक होतो’, असे ते म्हणाले आहेत. 

‘सोशल मिडियावर मला नेहमीच कमेंट्स येत असतात, की मी रतन टाटा यांच्यासारखा दिसतो. त्यामुळे खूप दिवसांपासून माझी इच्छा होती, की मला रतन टाटा यांची भूमिका करायला मिळावी. तशी संधी मिळाली, तर मी खूप खुश असेन असेही ठरले होते आणि आता पीएम नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटात मला ती संधी मिळाली. मी ही भूमिका करताना खूप आनंदी झालो आहे’, अशा भावना बोमन इराणी यांनी व्यक्त केल्या. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार दिग्दर्शित करत असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी अभिनेते बोमन इराणी यांची निवड झाली आहे. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंघ यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच बोमन इराणी यांनी अहमदाबाद याठिकाणी या चित्रपटासाठी शुटिंग सुरू केले आहे. 

बोमन इराणी‘ओमंग, विवेक आणि संदीप यांनी मला रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी विचारले असता, मी लगेच होकार दिला. चित्रपटाची टीम खूप छान आणि मेहनती आहे. विशेषतः मी विवेकचे कौतुक करेन. अतिशय अवघड आणि जोखमीची असलेली ही भूमिका करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. अतिशय समंजसपणे तो ही भूमिका वठवत आहे’, अशा शब्दांत बोमन इराणी यांनी विवेक ओबेरॉयचे कौतुकही केले आहे. 

संदीप सिंघचित्रपटाचे निर्माते संदीप सिंघ यांनी बोमन यांची निवड केली असून त्यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘बोमन इराणी हे सर्वांना प्रेरणा देणारे असे व्यक्तिमत्व आहे. कोणताही सीन करत असताना ते त्याआधी किमान ५० वेळा इतर कलाकारांसोबत त्याची उजळणी करतात. रतन टाटा यांची भूमिका त्यांनी खूप छान पद्धतीने साकारली आहे. त्यांच्याशिवाय ती इतक्या चांगल्या पद्धतीने कोणीही साकारू शकले नसते.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search