Next
जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण पाहण्याची संधी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खोडद येथे विज्ञान प्रदर्शन
BOI
Thursday, February 28, 2019 | 02:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे : जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असलेली खोडद येथील ‘जीएमआरटी’ दुर्बीण पाहण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गुरुवारी, २८ फेब्रुवारी आणि शुक्रवार, एक मार्च २०१९ असे दोन दिवस ही दुर्बीण सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येथील जीएमआरटी केंद्र आणि विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. 


यानिमित्त येथे शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, उच्चमाध्यमिक आणि अभियांत्रिकी अशा चार गटात विज्ञान प्रकल्प मांडले जातात. युनेस्कोने यंदाचे वर्ष ‘आवर्तसारणीचे १५०वे वर्ष’ घोषित केले आहे. त्या अनुषंगाने येथे एक विशेष दालन तयार करण्यात आले असून, तेथे आवर्तसारणीबाबत विशेष माहिती देण्यात येणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांना भेटण्याची संधी, विविध विज्ञान प्रयोग, बलूनचे उड्डाण, विविध संस्थांचे संधोधन पाहण्याची संधी येथे मिळणार आहे. 
 
शिवाजीनगर येथून नारायणगाव व पुढे खोडदला येण्यासाठी एस. टी महामंडळाने बसेसची सोय केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search