Next
महामेट्रोसंदर्भात पुढील सुनावणी २०१८ मध्ये
प्रेस रिलीज
Wednesday, December 06 | 05:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या मुदतवाढीला मान्यता देत पुढील १५ जानेवारी, २०१८ पर्यंत हा अहवाल सादर करण्याची मुभा तज्ज्ञांच्या समितीला दिली असून, या संदर्भात पुढील सुनावणी १५ जानेवारी २०१८ ला होणार आहे,’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

ते म्हणाले, ‘महामेट्रोच्या नदीपात्रातील कामावर पाच डिसेंबरला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल सादर होणार होता. त्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात सुनावणी झाली. यावेळी या समितीने  नदीपात्रात होणाऱ्या कामावर आधारित अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. ज्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या मुदतवाढीला मान्यता देत पुढील १५ जानेवारी, २०१८ पर्यंत हा अहवाल सादर करण्याची मुभा तज्ज्ञांच्या समितीला दिली आहे. याबरोबरच या तज्ज्ञ समितीला आवश्यक ती सर्व मदत ‘एमएमआरसीएल’कडून करण्यात येणार आहे.’

डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, ‘ही मुदत वाढविण्याची मुभा देत असताना नदीपात्रातील काम थांबविण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती; मात्र याला महामेट्रोचे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व प्रल्हाद परांजपे यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या मेट्रो संदर्भातील निर्णयाचे दाखले देत हे काम थांबविता येणार नाही, असे महामेट्रोच्या वकिलांच्या वतीने सांगण्यात आले. यावर १८ सप्टेंबर, २०१७ रोजी नदीपात्रात काम करण्याचे महामेट्रोला पूर्ण अधिकार राहतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावरून येत्या १५ जानेवारी २०१८ रोजी या संदर्भात पुढील सुनावणी होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link