Next
‘आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड’मध्ये भारताचा ‘सुवर्ण’योग
पहिल्यांदाच संघातील सर्व पाच सदस्यांनी सुवर्णपदक मिळवून रचला इतिहास
BOI
Tuesday, July 31 | 03:26 PM
15 0 0
Share this story

‘आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड’मध्ये सुवर्णपदक मिळवलेले पाच विद्यार्थी

यंदाच्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला आहे. या ऑलिंपियाडमध्ये सहभागी झालेल्या सर्वच म्हणजे पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तब्बल २१ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. या वेळची भारताची कामगिरी ही आजवरच्या सर्व कामगिरींपेक्षा सरस होती. भारताव्यतिरिक्त केवळ चीन हा एकच देश आहे, ज्या देशाच्या सर्वच खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले आहे. 

पोर्तुगालमधील लिस्बन शहरात यंदा आयोजित करण्यात आलेल्या या ४९व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये भारताच्या वतीने भास्कर गुप्ता (मुंबई), लय जैन (कोटा), निशांत अभांगी (राजकोट), पवन गोयल (जयपूर) आणि सिद्धार्थ तिवारी (कोलकाता) यांनी प्रतिनिधित्व केले होते. या ऑलिंपियाडमध्ये जगभरातील एकूण ३९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकली. या ऑलिंपियाडमध्ये भाग घेतलेल्या भारतीय संघाबद्दल‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’च्या (टीआयएफआर) ‘नॅशनल होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’मध्ये विज्ञान अधिकारी असलेले प्रवीण पाठक यांनी सविस्तर माहिती दिली. 

‘१९९८पासून आम्ही या ऑलिंपियाडमध्ये भाग घेत असून, सहभागी सर्व पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वेळी भारतीय संघातील या पाचही वीरांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी तीन वेळा आम्ही चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरलो होतो. त्यामुळे या वेळची कामगिरी आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आणि आनंदाची आहे,’ अशा शब्दांत प्रवीण पाठक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

‘जेईई’च्या टॉप १०मध्ये आहेत पवन आणि लय...
या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सहभागी झालेले पवन गोयल आणि लय जैन हे दोघे यंदाच्या ‘जेईई अॅडव्हान्स’च्या पहिल्या १० मुलांच्या यादीतही आहेत. त्यांच्या पाठोपाठ सिद्धार्थ तिवारी आणि भास्कर गुप्ता यांनीदेखील वरचे क्रमांक मिळवले आहेत. हे पाचही जण मेहनती आणि महत्त्वाकांक्षी आहेत. पुढील करिअरसाठी लय जैन अमेरिकेतील ‘एमआयडी’मध्ये जाणार असून, इतर तीन विद्यार्थी ‘मुंबई आयआयटी’त प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. या पाच जणांच्या संघात सर्वांत कमी वयाचा सदस्य अभांगी सध्या बारावीत असून, तोही पुढे ‘आयआयटी’साठी तयारी करत आहे. 

होमी भाभा सेंटरच्या वतीने अतिशय अवघड अशी एक परीक्षा घेऊन या पाचही जणांची त्यातून निवड करण्यात आली आहे. ऑलिंपियाडमधील इतिहास रचणाऱ्या या यशाबद्दल भाभा सेंटरच्या वतीने या सर्वांना सन्मानित करण्यात येणार आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link