Next
‘सांस्कृतिक पुण्याईनेच विश्वशांती सुरक्षित’
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत
BOI
Thursday, June 06, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

समाधान गायकवाड लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस व अन्य मान्यवर

पुणे : ‘हिंसा, विकृती, अत्याचार ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी, प्रेम आणि अहिंसा या सांस्कृतिक पुण्याईनेच विश्वाची व मानवाची शांतता सुरक्षित राहू शकते आणि समाजाचा विकास शक्य होतो,’असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. समाधान गायकवाड लिखित आणि यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘काळजातील काव्यप्रक्षेपण’ या पुस्तकावरील चर्चात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. अविनाश सांगोलेकर, पार्थ पोळके, बबन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, ‘काळजातील स्पंदनांची काव्य अभिव्यक्ती ही सांस्कृतिक लोकशाहीची कलात्मक श्रीमंती असते. लोकशाहीत हिंसा आणि क्रौयाला जागा नसते. कारण माणसामाणसातील जिव्हाळा हाच लोकशाही समाजवादाचे प्राणतत्त्व असते. समाधान गायकवाड यांची कविता शत्रुत्वाऐवजी मैत्र भावनेचा पुरस्कार करून विश्वात्मक मानवतेचे सर्वार्थाचे सर्वांचे कल्याण शब्दाशब्दांत अधोरेखित करते. मानवी प्रेमात  भिजलेली कलाकृतीच श्रेष्ठ असते.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रूपाली अवचरे यांनी केले. या वेळी चाळीसगाव येथील आदिवासी लोकसंस्कृतीचे अभ्यासक सुनील गायकवाड यांचा साहित्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. विजय अंधारे व प्रा. स्नेहा गायकवाड यांनी केले. जितेन सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन आनंद गायकवाड, ओंकार कांबळे, आदिनाथ जावीर, हृदयमानव अशोक, सागर काकडे, शुभम चव्हाण, अक्षय तायडे आदींनी केले. कार्यक्रमाला बापूसाहेब सोनवणे, प्रकाशक निखिल लंभाते, सुरेश पाटोळे, मसूद पटेल, तुषार पाटील, विनोद अष्टुळ, बंडा जोशी, मिलिंद जोशी, डॉ. शुभा लोंढे, डॉ. आशा राव, विजय शेंडगे, रमेश जाधव, ज्योती लाड, सुरेश धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search