Next
‘यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचून विद्यार्थी घडतात’
प्रेस रिलीज
Wednesday, January 09, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टातून यशाचा शिखरावर पोहचलेल्या व्यक्तींची चरित्रे मार्ग दाखवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशस्वी झालेल्यांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचायला हवीत. त्यांच्याकडून कठोर परिश्रम, कामातील सचोटी, प्रामाणिकपणा, नेतृत्व कौशल्य आदी गुण आत्मसात करावेत,’ असे मत फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालक व मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले.



कराची एज्युकेशन सोसायटीच्या बीटी शहानी नवीन हिंद हायस्कूल अॅंड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या प्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष व विश्वस्त लेफ्टनंट जनरल दीपक अजवानी,  विश्वस्त एम. एल. भंबानी, सचिव दीपक रामनानी, सदस्य अरुणा जेठवानी, चित्रेश भाटीया, यश कामदार, वरिष्ठ पत्रकार विनोद रोहानी, नवहिंद हायस्कूलचे प्राचार्य सुरेश पेशवानी आदी उपस्थित होते.

रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अंगभूत कलागुण असतात. पालक-शिक्षकांनी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. समाजाप्रती आपण देणे लागतो या भावनेतून काम केले पाहिजे. मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम आम्ही करतो आहोत, याचे समाधान आहे.’

शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना छाब्रिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘फिनोलेक्स’चे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांच्या जीवनावर सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांची वाहवा मिळवली. दीपक अजवानी, एम. एल. भंबानी यांनी मार्गदर्शन केले. सुरेश पेशवानी यांनी प्रास्ताविक केले. दीपक रामनानी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link