Next
बुद्धीबळ स्पर्धेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ला विजेतेपद
प्रेस रिलीज
Tuesday, August 21, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this article:

बुद्धीबळ स्पर्धेतील विजेत्या ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या संघाला ‘आयुर्वेद कॉलेज’चे उपप्राचार्य डॉ. विजय भालसिंग आणि ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते पारितोषिक  देण्यात आले..
पुणे : भारती विद्यापीठाच्या आयुर्वेद कॉलेजच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ने विजेतेपद मिळवले. ‘न्यू लॉ कॉलेज’ उपविजेते पदाचे मानकरी ठरले. ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या धनकवडी कॅम्पसमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते शशिकांत कुतवळ यांच्या हस्ते झाले. या वेळी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य अभिजीत पाटील, डॉ. नेताजी जाधव उपस्थित होते. 

या स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’, ‘मेडिकल कॉलेज’, ‘आयुर्वेद कॉलेज’, ‘होमिओपॅथी कॉलेज’, ‘यशवंतराव मोहिते कॉलेज’, ‘न्यू लॉ कॉलेज’, ‘कॉलेज ऑफ एम.एस.डब्ल्यू’, ‘बी पी एच कॉलेज’ (फिजिकल एज्युकेशन), ‘डेंटल कॉलेज’, ‘डेंटल कॉलेज’ (मुंबई), ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायो टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयांचा समावेश होता. 

स्पर्धेचा अंतिम सामना ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ आणि ‘न्यू लॉ कॉलेज’ यांच्यात झाला. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ ने तीस गुण, तर ‘न्यू लॉ कॉलेज’ने २५ गुण मिळवले. स्पर्धेतील विजेत्यांना ‘आयुर्वेद कॉलेज’चे उपप्राचार्य डॉ. विजय भालसिंग आणि ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विजेत्या संघात जय चौहान (इलेक्ट्रीकल विभाग), समर्थ जैन (सिव्हील), अमूल जयस्वाल (ईएनटीसी), विपूल मौर्य (मेकॅनिकल), अन्शुल गुप्ता (मेकॅनिकल), प्रखर जैन (मेकॅनिकल) यांचा समावेश होता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search