Next
पुण्यात होणार १२ वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन
स्वागताध्यक्षपदी डॉ. पी. ए. इनामदार यांची निवड
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे  मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ दरम्यान पुणे येथे होणार असून, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील आझम कॅंपस येथे मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या डॉ. शेख इकबाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विलास सोनावणे यांच्या ठरावाला डॉ. बशरत अहमद यांनी अनुमोदन दिले.

डॉ. पी. ए. इनामदारमहाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली, तरी त्यांची व्यवहाराची आणि अभिव्यक्त होण्याची भाषा मराठी आहे. मुस्लीम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी २८ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. हे साहित्य संमेलन २३ वर्षांनी पुन्हा पुण्यात होणार आहे. आझम कॅंपस (पुणे कॅम्प) येथे संमेलनाचे आयोजन केले आहे. या चळवळीची साहित्य संमेलने या आधी सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत.

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात डॉ. शेख इकबाल मिन्ने, प्रा. लियाकत अली पटेल, अन्वर जावेद शेख, डॉ. बशरत अहमद, प्रा. आरिफ शेख, युनूस आलम सिद्दीकी, साजिद पठाण, ए. के. शेख, विलास सोनावणे, इम्तियाझ शेख, महमूद काझी, अब्दुल अझीम शेख, बशीर मिन्ने, कलीम अझीझ, दहार मुजावर, डॉ. केतकी भोसले, अब्दुल लतीफ मगदूम, नूरजहाँ शेख, शहाजहान मगदूम, डॉ. पांडुरंग कंद, कौसर मुजावर, आय. के. शेख यांचा समावेश आहे.

संमेलनात सहभागी होण्यासाठी संपर्क : ७०४०७ ९११३७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search