Next
बँक ऑफ बडोदाच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्याचे वाटप
BOI
Tuesday, July 23, 2019 | 01:28 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
‘बँक ऑफ बडोदा’च्या ११२व्या वर्धापनदिनानिमित्त रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिनकर कदम होते. 



या वेळी निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ, धर्मराज गुंजाळ, सिद्धेश्वर भोसले, अभिमन्यू बिस्किटे, दादा कदम, मुध्याध्यापक सुनील शिंदे, नागनाथ माळी, श्रीदत्त इरिगेशन सिस्टीमचे दत्तात्रय भोसले, बडोदा बँकेचे शेती अधिकारी सतीश गाडे, रामचंद्र यमगर, राजू भराटे, बब्रुवान कारमकर, नागेश मोरे, रणजित खुर्द, रयत शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल व खोडरबर या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 



त्यानंतर शाखाधिकारी श्री. रणदिवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये शाळेच्या प्रांगणात चिंच, कडुनिंब व करंज याबरोबरच शेवगा व कढीपत्त्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी मानले. 

या वेळी बडोदा बँकेचे रोपळे शाखाधिकारी अभिजित रणदिवे म्हणाले, ‘बँकेचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आम्ही केवळ झाडे लावून आमचे काम थांबवणार नसून, या झाडांच्या संरक्षणासाठी श्रीदत्त इरिगेशन सिस्टिमच्या माध्यमातून ठिबक सिंचन संच बसवून, प्रत्येक झाडाला ट्री-गार्डही बसवणार आहोत.’

(पुण्यातील कार्यक्रमाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search