Next
मनोविकास प्रकाशनच्या वतीने ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Monday, January 14, 2019 | 06:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : आयकर विभागाच्या धाडी आणि त्याच्याशी निगडीत किस्से आपण सर्वांनीच ऐकले आहेत आणि हे किस्से कायमच कुतूहलाचा विषय बनलेले आहेत. याविषयी आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी संग्राम गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीचे प्रकाशन मनोविकास प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार आहे. 

‘येत्या शनिवारी, १९ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. साहित्यिक व समीक्षक नितीन रिंढे आणि रंगकर्मी अतुल पेठे हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कादंबरीतील निवडक भागाचे अभिवाचन देखील अतुल पेठे करणार आहेत,’ अशी माहिती मनोविकास प्रकाशनचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर यांनी दिली.  हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link