Next
‘मोटोस्पोर्ट रॅली लाइफ’चे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, November 03 | 01:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : हीरो मोटोस्पोर्ट्स रॅली लाइफचा दुसरा सीझन नुकताच पुण्यातील अमनोरा येथे आयोजित केला होता. या वेळी हीरो मोटोस्पोर्ट क्रू सदस्यांबरोबर भारतातील प्रथम डकार रॅलीचे प्रतिभागी सीएस संतोष आणि त्यांचे सहकारी सथ्यराज ए. उपस्थित होते.

भारतातील सर्वात यशस्वी रॅली रेसरचा त्यांच्या चाहत्यांना आणि युवा पिढीला परीचय करून देणे हा या मोटोस्पोर्ट रॅलीचा उद्देश होता. या निमित्ताने रेसर्सचे चाहते त्यांच्याशी वार्तालाप करू शकतील. त्याचबरोबर अनोख्या व धाडसी अशा या खेळाचा आनंद घेऊ शकतील. या वेळी १५० हून अधिक प्रशंसक हा रॅली स्पोर्ट बघण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धेनंतर प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. संतोष यांनी रॅली स्पोर्टचे वेळवेगळे स्टंट करून सर्व उपस्थितांना रोमांचित केले.
 
अमानोरा मॉलतर्फे नेहमीच अशा प्रकारचे आयोजन केले जाते. डिसेंबरमध्येही इंडियन सुपरबाइक फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link