Next
‘हिरो मोटोकॉर्प’तर्फे दुचाकींची विक्रमी विक्री
प्रेस रिलीज
Wednesday, April 04, 2018 | 03:56 PM
15 0 0
Share this story

मुंबई : हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या जगातील सर्वांत मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.५९ दशलक्ष (७५ लाख) युनिट्स मोटरसायकल्स आणि स्कूटर्सची विक्री झाल्याचा नवा विक्रम घोषित केला आहे. आजवर दुचाकी उत्पादक क्षेत्रातला विक्रीचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. परिणामी, त्यांची १४ टक्के अशी दोन आकडी दमदार व्यापारवृद्धी (एकत्रित) साधली गेली असून, गेल्या वर्षात विक्रीचा हा आकडा ६६ लाख ६४ हजार २४० युनिट्स होता.

‘हिरो मोटोकॉर्प’ने वित्तवर्षाची अखेर अत्यंत तगड्या व्यापारवृद्धीने केली असून, मार्च २०१८ या एकाच महिन्यात कंपनीने मासिक विक्रीचा विक्रमही मोडून २० टक्के व्यापारवृद्धी साधत सात लाख ३० हजार ४७३ युनिट्स विक्री गाठली. या तुलनेत मार्च २०१७मध्ये कंपनीने सहा लाख नऊ हजार ९५१ युनिट्सची विक्री केली होती.

भविष्यातील बाजारपेठेच्या मागण्यांकडे लक्ष पुरवत ‘हिरो मोटोकॉर्प’ने आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी या वित्तवर्षात मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०१८मध्ये ‘हिरो मोटोकॉर्प’च्या आंध्र प्रदेशातील चितूर येथील अत्याधुनिक आठव्या उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली. या अतिरिक्त उत्पादन केंद्राच्या माध्यमातून, कंपनीची एकूण वार्षिक क्षमता ११ दशलक्षवर पोहोचणार आहे. सध्या कंपनीने वार्षिक ९.२ लक्ष उत्पादन क्षमता नियोजित केली आहे.

प्रवासी गाड्यांच्या सेगमेंटमधील आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करताना, वित्तवर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीने पॅशन प्रो, पॅशन एक्स प्रो आणि सुपर स्प्लेस्प्लेंडर या तीन नव्या बाइक्स बाजारात आणल्या. २०१८-१९मध्येही नव्या उत्पादनांचे नियोजन करण्यात आले असून, मोटरसायकल सेगमेंटमध्ये ‘एक्स्ट्रीम २००आर’ आणि ‘एक्स पल्स’ ही मॉडेल्स तर, स्कूटर्स सेगमेंटमध्ये ‘ड्यूएट १२५’ आणि ‘माएस्ट्रो एज १२५’ ही मॉडेल्स सादर होणार आहेत. स्थानिक मोटरसायकल बाजारपेठेत ‘हिरो मोटोकॉर्प’ने सातत्याने ५० टक्क्यांहून अधिक वाटा राखला आहे.

‘हिरो मोटोकॉर्प’चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पवन मुंजाळ म्हणाले, ‘हिरो मोटोकॉर्प कंपनीने वित्तवर्ष २०१७-१८मध्ये सर्वोच्च व्यापारवृद्धी साधल्याने हे वर्ष सर्वाधिक वाढीचे ठरले आहे. या वर्षांत आम्ही नवे लक्षवेधी मापदंड रचले असून दुचाकी उद्योगक्षेत्रात नवीन क्रांतीही आम्ही उभी केली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ आणि २०१७चे कॅलेंडर वर्ष या दोन्ही काळातील वार्षिक विक्रीचा सात दशलक्षांचा आकडा संपादन करताना या वर्षात हे सिद्ध झाले आहे की, ‘हिरो’ हीच आजही बाजारपेठेतील सर्व ग्राहकांची पहिली निवड आहे. आमच्या एकूण जागतिक विक्रीवृद्धीमुळे आमच्या जागतिक बाजारपेठेतील व्यापारवृद्धीला मोठी चालना मिळाली आहे.’

‘जगभरातल्या आमच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून ते आमच्या उत्पादन क्षमता आणि ग्राहककेंद्री व्यापारवृद्धीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे,’ असेही मुंजाळ यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link