Next
ग्राम परिवर्तनासाठी सिद्धिविनायक न्यासाची देणगी
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story


मुंबई : राज्यातील खेड्यांच्या परिवर्तनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना’साठी ‘श्री सिद्धिविनायक गणपती न्यासा’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा कोटी रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धिविनायक न्यासाच्यावतीने मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी हा धनादेश विधानभवनातील एका कार्यक्रमात दिला.

राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या, तसेच वित्तीय संस्थांच्या कंपनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील एक हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने, ग्रामीण  भागात शाश्वत विकासासह ही गांवे सक्षम बनण्याकरिता ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने २५ सप्टेंबर २०१७च्या शासन निर्णयान्वये घेतला. हा कार्यक्रम मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली  यशस्वीपणे राबविण्यात येत असून, त्याची फलश्रृती म्हणून पहिल्या टप्पात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत  पाचशे ८८ गावांमध्ये कामे चालू आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिध्दीविनायक ट्रस्टबददल कृतज्ञता व्यक्त केली आणि  ते म्हणाले, ‘महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे असाधारण व्यासपीठ आहे. इथे शासन आणि खाजगी कंपन्या एकत्र येऊन महाराष्ट्रा तील ग्राम विकासासाठी काम करीत आहेत. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनसोबत ग्रामीण भागाचा विकास करणारी, श्री सिध्दीविनायक ट्रस्ट ही पहिली भागीदारी धर्मादाय संस्था आहे. त्यांच्या यासहभागाबददल ट्रस्टच्या अध्यक्ष व संचालकांचे आभार मानतो.’

श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मुख्यमंत्र्यांना या अभिनव कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले, ‘शासनाचा हा ग्राम परिवर्तनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन मार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाव्दारे, सिध्दीविनायक ट्रस्टचा  हा निधी ग्रामीण जनतेच्या विकासासाठी वापरला जाणार आहे याबद्दल मी समाधानी आहे.’    

मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात, सिध्दीविनायक ट्रस्टसारख्या सामाजिक बांधिलकी असलेल्या संस्था सक्रिय सहभाग नोंदवतील, अशी अपेक्षा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी व्यक्त केली.
 
या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारिख, आनंद राव, संजय सावंत, महेश मुदलियार, गोपाळ दळवी, सुबोध आचार्य, विशाखा राऊत, पंकज गोरे, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, उप कार्यकारी अधिकारी रवी जाधव आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link