Next
फ्रान्स मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई
प्रेस रिलीज
Saturday, January 12 | 04:28 PM
15 0 0
Share this story

डॉ. सतीश देसाईपुणे : पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फ्रान्स देश, तेथील जीवन, संस्कृतीशी जोडणाऱ्या फ्रान्स मित्र मंडळ या पुण्यातील ख्यातनाम संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांची निवड झाली.

पुण्यात झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ. देसाई, मानद अध्यक्ष म्हणून निर्मला पुरंदरे, उपाध्यक्ष म्हणून डॉ. उल्हास जोशी, प्रमुख कार्यवाह म्हणून भारती भिडे, सहकार्यवाह म्हणून माणिक कोतवाल, खजिनदार डॉ. दीपक मांडे, सदस्य म्हणून डॉ. वीणा दीक्षित, मेघना साठे यांची निवड करण्यात आली.

फ्रान्स मित्र मंडळाचा सुवर्णमहोत्सव नुकताच पुण्यात झाला. यात डॉ. देसाई यांच्या गतिमान संयोजनाचा मोठा वाटा होता. अच्युतराव आपटे व फादर द गलरी यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मला पुरंदरे, शंतनूराव किर्लोस्कर, प्रतापराव पवार यांच्या योगदानाने झाली.

‘मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केंद्रांवरून साधारण २५ व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. या व्यक्तींची निवड त्या त्या केंद्रांवर केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते; तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो. आतापर्यंत ६०० मराठी बांधव फ्रान्सला या माध्यमातून भेट देऊन आले आहेत,’ अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली.

सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालीरिती समजून घेतात. यातून परस्पर स्नेहवृद्धी साधली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link