Next
शास्त्र आणि शस्त्राचा अभ्यास करून जेते व्हा !
कर्नल जोगळेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 12:04 PM
15 0 0
Share this article:

भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘आर्ट सर्कल’ कार्यक्रमात निवृत्त कर्नल अरविंद जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जोगळेकर यांचा  प्राचार्य आनंद भालेराव यांनी सत्कार केला.पुणे : ‘अर्जुन निर्माण करायचे असतील,तर गुरूदेखील द्रोणाचार्यांसारखे असावे. विद्यार्थ्यांनी शास्त्र आणि शस्त्राचा अभ्यास करून यश मिळवावे, असे आवाहन निवृत्त कर्नल अरविंद जोगळेकर यांनी केले. 

भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘आर्ट सर्कल’ कार्यक्रमात ‘मी एक सैनिक’ या विषयावर ते बोलत होते.  

महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद भालेराव यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. अनघा सोमण यांनी केले .

जोगळेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘सैन्यात इन्स्ट्रक्टर हा एक मानाचा तसेच जबाबदारीचा हुद्दा समजला जातो. कारण याच शिक्षकांच्या हाताखालून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यावरच सैन्याची आक्रमकता, नैपुण्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता अवलंबून असते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search