Next
गुढीपाडव्यानिमित्त ‘तनिष्क’कडून सोन्याचे नाणे मोफत
प्रेस रिलीज
Wednesday, March 14 | 05:48 PM
15 0 0
Share this story

पुणे :  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, ‘तनिष्क’तर्फे  सोन्याच्या प्रत्येकी १० ग्रॅम खरेदीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या दहा हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना सोन्याचे ०.२ ग्रॅमचे नाणे मोफत मिळणार आहे. ही योजना १७ आणि १८ मार्च या दोन दिवसांसाठीच आहे. 

 दागिनेप्रेमींसाठी आनंदाची आणखी एक योजना तनिष्क घेऊन येत आहेत. २२ कॅरेट शुद्धतेच्या तुमच्या जुन्या सोन्याच्या बदल्यात शून्य टक्के घट!  जुने दागिने बदलून घेताना प्रत्येक दहा ग्रॅम जुन्या सोन्याच्या बदल्यात रु. ३३६०* (अटी लागू)पर्यंत जास्त किंमत मिळवण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे. ही योजना तनिष्कच्या सर्व शोरूम्समध्ये सुरू आहे.

या बाबत अधिक माहिती देताना टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी विभागाच्या मार्केटिंग उपाध्यक्षा  दीपिका सभरवाल तिवारी म्हणाल्या, ‘गुढीपाडव्याद्वारे होणारी हिंदू नववर्षाची सुरुवात महाराष्ट्रातले विविध समाजाचे नागरिक आपापल्या परंपरेनुसार साजरी करतात. या परंपरांना साजेसा सोन्याचा आणि हिऱ्यांचा साज पुरवण्यात तनिष्क नेहेमीच अग्रस्थानी राहिले आहेत. तनिष्कचा दर्जा, विश्वासार्हता आणि आकर्षक योजना आमच्या ग्राहकांचे त्यांच्या आवडी आणि बजेटप्रमाणे समाधान करतील याची आम्हाला खात्री आहे.’

‘ग्राहकांना शुद्धतम आणि उच्च दर्जाचे दागिने पुरवणारे ठिकाण म्हणून आपला लौकिक कायम राखणे यासाठी तनिष्क वचनबद्ध आहे. त्यांचा सोन्याच्या शुद्धतेविषयीचा आग्रह अधोरेखित करणारे कॅरेटमीटर त्यांच्या प्रत्येक दुकानात उपलब्ध आहे आणि त्याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री त्यांच्या डोळ्यासमोर करून घेता येते. निर्विवाद दर्जा, अतुलनीय कारागिरी आणि खास डिझाइन्स यांचे दुसरे नाव म्हणजे तनिष्क. हा लौकिक कायम राखण्यासाठी तनिष्क कायम जागरूक आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link