Next
‘यशदा’तर्फे माहिती अधिकार कायद्याचा अभ्यासक्रम सुरू
BOI
Saturday, June 15, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this article:

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)तर्फे ‘माहितीचा अधिकार अधिनियम २००५’ हा कायद्याचे प्रशिक्षण देणारा दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून यासाठी एकूण तीन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. 

१२ ऑक्टोबर, २००५पासून देशभरात हा अधिनियम लागू झाला आहे. ज्यांना या कायद्याविषयी अधिक माहिती व ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे, अशा लोकांना या अभ्यासक्रमाचा फायदा होईल. हा अभ्यासक्रम नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, समाज संशोधक, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे. 

अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क दोन हजार रुपये असून, हे शुल्क महासंचालक, यशदा, पुणे यांच्या नावाने डी. डी. देऊन अथवा रोख रक्कम देऊन भरता येईल. नाव नोंदणी, अर्ज व अभ्यासक्रमाचा तपशील यशदाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
दूरध्वनी : ०२०-२५६० ८२१६ / ०२०-२५६० ८१३० 

वेबसाइट : https://www.yashada.org/
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search