Next
सातव्या आर्थिक गणनेसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
महाराष्ट्रासह केंद्रशासित प्रदेशातील साधन व्यक्ती सहभागी
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:


नवी मुंबई : देशाच्या सातव्या आर्थिक गणनेसाठी प्रशिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज (एक जून २०१९) खारघर- नवी मुंबई येथील ग्रामविकास भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील साधन व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले.

या वेळी आपले सरकार, ई-सेवा केंद्राचे राज्यस्तरीय प्रमुख वैभव देशपांडे, समीर पाटील, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्व्हेक्षण संस्थांच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या उप महानिदेशक सुप्रिया रॉय, नागपूर विभागाचे श्रीनिवास उपाला, दिल्ली येथील क्षेत्रीय कार्यालय विभाग उप महानिदेशक इ. के. तोपराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक आर. आर. शिंगे, सहसंचालक जयवंत सरनाईक, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास संस्थेच्या उपसंचालक भाग्यश्री साठे यांसह राज्यभरातील सांख्यिकी अधिकारी, आपले सरकार ई-सेवा केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते.


कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले, ‘देशाची आर्थिक गणना ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी अचूक व वस्तुनिष्ठ तथ्यसंकलन होणे आवश्यक आहे. या आर्थिक गणनेसाठी मोबाइल ॲपचा व माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने ही गणना अधिक अचूक व्हावी.’ 


या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. दिवसभरात तीन सत्रांत विविध विषयांवर उपस्थित सहभागींना मार्गदर्शन करण्यात आले. या नंतर हे प्रशिक्षक जिल्हास्तरावर प्रगणकांना प्रशिक्षित करतील, अशी माहिती देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search