Next
‘श्री ठाणेदार हे व्यावहारिक जगतातील टारझन’
डॉ. अनिल अवचट यांचे गौरवोद्गार
BOI
Tuesday, February 19, 2019 | 04:33 PM
15 0 0
Share this story

श्री ठाणेदार लिखित ‘ही श्रीची इच्छा’ या आत्मकथेचा उत्तरार्ध असलेल्या ‘पुन्हा श्री गणेशा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री ठाणेदार, सुधीर गाडगीळ आणि रसिका राठिवडेकर उपस्थित होते.

पुणे : ‘बेळगावहून अमेरिकेत जाऊन एक यशस्वी उद्योजक बनलेले आणि मंदीच्या काळात कंपनी, घर आणि किमती मोटार विकून पूर्णपणे झिरो झालेले आणि आपल्या कतृत्वाने पुन्हा एकदा गगनभरारी घेणारे श्री ठाणेदार हे व्यावहारिक जगतातील टारझन आहेत,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी काढले.

श्री ठाणेदार लिखित ‘ही श्रीची इच्छा’ या आत्मकथेचा उत्तरार्ध असलेल्या ‘पुन्हा श्री गणेशा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री ठाणेदार, प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ, सुश्रुत कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रकाशन समारंभानंतर श्री ठाणेदार यांची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली.


डॉ. अवचट म्हणाले, ‘ज्या माणसाने कधी आयुष्यात पैसा मिळवला नाही, कधी कर्ज काढले नाही अशा माझ्यासारख्या माणसाच्या हस्ते ज्याने मंडईतून भाजीपाला विकत घ्यावा अशा पद्धतीने अमेरिकेत कंपन्या विकत घेतल्या आणि विकल्या अशा श्री ठाणेदार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही अजब बाब आहे. स्वदेशात आपल्याला आपले मित्र, घरचे, नातेवाईक सर्वजण सहकार्य करतात; मात्र अमेरिकेसारख्या देशात जाऊन पाय रोवून उभे राहणे हे अवघड असते. अशावेळी धीटपणा, मागे न हटण्याची प्रवृत्ती यामुळे अमेरिकेतील मंदीच्या काळात झिरो झालेले श्री ठाणेदार यांनी सर्व संकटांवर मात करत पुन्हा एकदा बाजारात स्वत:ला यशस्वी उद्योजक म्हणून सिध्द केले ही अभिमानास्पद गोष्ट आहे.’ 


सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या ठाणेदार यांच्या मुलाखतीमध्ये ठाणेदार यांच्या जीवनाचा पट उलगडला. ठाणेकर म्हणाले, ‘मी माझ्या स्वत:वरचा विश्वास संकटकाळात कधीही ढळू दिला नाही. पराभव होतो तेव्हा मी अजिबात रडत नाही. उद्योजक बनण्यासाठी जिद्द, धडाडी आणि आत्मविश्वास पाहिजे. हार मानायची नाही हे, मी माझ्या आईकडून शिकलो, तर वडिलांनी लहान वयात माझ्यावर जो व्यावहारिक विश्वास टाकला त्यामुळे मी मोठमोठ्या कंपन्या घेऊ शकलो. सर्व स्थिर असले की मी अस्थिर होतो. त्यामुळे एका कंपनीचे कामकाज व्यवस्थित सुरू झाले की मी काहीतरी दुसरे करायला लागतो. ’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रसिका राठिवडेकर यांनी मानले. 

(‘पुन्हा श्री गणेशा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link