Next
हिमायतनगर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी संजय माने
नागेश शिंदे
Tuesday, January 29, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे निष्ठावंत आणि कट्टर समर्थक असलेल्या संजय माने यांची हिमायतनगर काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

२६ जानेवारी २०१९ रोजी जवळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, पप्पा पाटील, हिमायतनगर तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, रफिक सेठ आदींच्या उपस्थितीत संजय माने यांना हिमायतनगर शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले.

संजय मानेमाने हे गेल्या अनेक वर्षांपासून जवळगावकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण मतदारसंघात ओळखले जातात. ते मार्केट कमिटीच्या संचालिका शांताबाई माने यांचे पुत्र असून, त्यांचे वडीलही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी तालुक्यात युवकांची मोठी फळी निर्माण केली असून, सध्या ते व्यापारी असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना हिमायतनगर काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या वेळी हिमायतनगर अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी फेरोज खान पठाण, तर युवक काँग्रेस सेलच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव माने यांची निवड करण्यात आली. याचवेळी अनेक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, हिमायतनगरमधील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, नांदेड मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश शिंदे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, पंच्यात समिती सभापती मायाताई राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती परमेश्वर गोपातवाड, गोविंद बंडेवार, अनिल पाटील यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील सर्व  कार्यकर्त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link