Next
पूजा वाघ यांना ‘टाइमलेस रिफ्रेशिंग ब्युटी’चा मुकुट
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘ल फेम वर्ल्डवाइड’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या पूजा वाघ यांनी ‘टाइमलेस रिफ्रेशिंग ब्युटी’ हा मानाचा मुकुट पटकाविला आहे. डॉ. राधिका वाघ व प्रशांत सोलापूरकर यांच्या ‘अवयुक्ता मीडिया’ या संस्थांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष होते.

ही स्पर्धा गोवा येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. यात भारत, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ओमान आदी देशांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. मिस व मिसेस अशा दोन विभागांमध्ये बाह्य सौंदर्याबरोबरच अंतरिम सौंदर्याचेही परीक्षण करणाऱ्या कसोट्या या वेळी लावण्यात आल्या होत्या. यातील विवाहित गटात पूजा वाघ यांनी हा मानाचा मुकुट पटकाविला. स्पर्धेच्या संस्थापक संचालिका डॉ. राधिका वाघ, प्रसिद्ध अभिनेता व ‘मिस्टर इंडिया’ हा किताब पटकाविलेला राघव शर्मा, उद्योजिका अंजली मोदी, मानिनी मिश्रा यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

या सात दिवसांच्या स्पर्धेत अविवाहित गटात १८ ते ३० वयोगटांतील, विवाहित गटात ३० ते ५० वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. येथे सॉफ्ट स्कील्स, वर्तणूक, मुलाखत त्याचबरोबर विविध पेहारावांमधील फोटोशूट अशा विविध पातळ्यांवर परीक्षण करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे संयोजन प्रसिद्ध मॉडेल अलिशिया व अंजली राऊत यांनी केले होते.

पूजा वाघ म्हणाल्या, ‘माझ्या यशाचे श्रेय माझे पती प्रसाद वाघ व स्पर्धेचे आयोजक डॉ. राधिका वाघ व प्रशांत सोलापूरकर यांचे आहे. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. आजवर अनेक स्पर्धा मी जिंकले असले, तरी प्रत्येक अनुभव हा माझ्यासाठी नवा असतो. तसाच हा अनुभवही मला माणूस म्हणून समृद्ध करणारा ठरला. या स्पर्धेची खासियत म्हणजे बाह्य सौंदर्य, तर सर्वच बघतात, पण अंतरिम सौंदर्यदेखील तेवढेच महत्त्वाचे असते, याचा विचार येथे करण्यात आला होता.’

पूजा वाघ यांनी आजवर ‘मिसेस महाराष्ट्र रेडीअंस २०१७’, ‘मिसेस पेशवाई क़्वीन २०१८’, ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१९’ (दुबई), ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल ग्लॅमरस लूक २०१९’ आदी स्पर्धा जिंकल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search