Next
अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिर
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 03:52 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. पंकज जिंदल. शेजारी डावीकडून राजीव अगरवाल, अरुण सिंघल, उमेश जालान, सतीश नेवतीया व डॉ. भूषण सोमवंशी.

पुणे : ‘अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, आर. एम. धारिवाल फाउंडेशन आणि गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २२  व २३ डिसेंबर २०१८ या कालावधीत मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅंड सर्जरी शिबिर आयोजित केले आहे. या हे शिबिर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे होईल. शिबिराचे हे नववे वर्ष आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध हॅंड सर्जन डॉ. पंकज जिंदल आणि ट्रस्टचे अध्यक्ष सतीश नेवातीया यांनी दिली.

या वेळी ट्रस्टचे सचिव अरुण सिंघल, खजिनदार संजय अगरवाल, प्रकल्प संचालक उमेश जालान, राजीव अगरवाल मदनबाई धारिवाल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. भूषण सोमवंशी आदी उपस्थित होते.

डॉ. जिंदल म्हणाले, ‘भाजल्यामुळे झालेल्या जखमा, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे किंवा शरीराचे व्यंग, वाकडी बोटे, मस, चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, दुभंगलेले ओठ, वाकडे नाक आदी गोष्टींवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या सगळ्या शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत असणार आहेत.’

‘देशात ७० लाख लोकांना भाजल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दैनंदिन काम करणेही शक्य होत नाही. अशा लोकांवर उपचार करून त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. अनुभवी सर्जनकडून या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. या शस्त्रक्रियांमुळे जीवन बदलून गेले आहे. पुढील काही वर्षांत या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गावांमध्येही अनेक लोक अशा शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत,’ असे डॉ. जिंदल यांनी सांगतिले.

नेवातीया म्हणाले, ‘डॉ. पंकज जिंदल यांनी आपल्या अनुभवी टीमसह सामाजिक भावनेतून हजारो रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ककरून त्यांना नवी ओळख दिली आहे. गेल्या नऊ वर्षांत शेकडो रुग्ण पुन्हा नव्याने आयुष्य जगू लागले आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.शिबिरात सहभागी होण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.’

अधिक माहितीसाठी : ७५८८१ ४८८०५, ७०६६० २८११३, ९०११० ०७६६९, (०२१३८) २२५५९९, २२४५९९.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search