Next
प्रजासत्ताक दिनी मुले अनुभवणार ‘झिपलाइन’चा थरार
रत्नदुर्ग माउंटेनीअर्सतर्फे रत्नागिरीत आयोजन
BOI
Thursday, January 24, 2019 | 03:30 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील रत्नदुर्ग माउंटेनीअर्सतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१९ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत शहरातील भाट्ये पुलावरून रॅपलिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी संस्था २५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने खास आठ ते १८ वयोगटांतील मुलांना झिपलाइन (Zipline) हा साहसी क्रीडा प्रकार अनुभवता येणार आहे.  

‘रत्नदुर्ग’तर्फे सलग १८ वर्षे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने २६ जानेवारीला शहरातील भाट्ये पुलावरून रॅपलिंगचे आयोजन केले जात आहे. येत्या २६ तारखेला आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी मुलांना पुलाच्या मध्यावरून किनाऱ्यापर्यंत पाण्यावरून पक्षांप्रमाणे विहार करता येणार आहे. यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल.

या उपक्रमामध्ये मुलांनी सहभागी व्हावे आणि वेगळाच थरार अनुभवावा, असे आवाहन रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे अध्यक्ष शेखर मुकादम व उपाध्यक्ष विरेंद्र वणजु यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
गणेश चौघुले :
९०८२१ ०७८०१
जितेंद्र शिंदे : ९९२२९ ३७८८०
विरेंद्र वणजु : ९९६०९ ७७३३३
शेखर मुकादम : ८६०५८ ००८०२
किशोर सावंत : ९२२५१ ०३३३८
नेत्रा राजेशिर्के : ९४२२४ ३०८४६
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link