Next
मातंग समाजाचा इतिहास
BOI
Wednesday, September 19, 2018 | 09:50 AM
15 0 0
Share this article:

जातीभेदाची दाहकता आता कमी झालेली असली, तरी ‘जी जात नाही ती ‘जात’ हे वास्तव आहे. भारतातील प्रत्येक जातीचा एक इतिहास आहे. त्या पैकी एक मांग (मातंग) ही जात असून, या समाजाच्या पोटजाती, भाष संस्कृती, रीतीरिवाज व ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व असले, तरी यातील समाज उपेक्षितच राहिला आहे,’ असे सांगत डॉ. सोमनाथ डी. कदम यांनी ‘मातंग समाजाचा इतिहास’ या पुस्तकातून समाजाचा इतिहास वाचकांसमोर आणला आहे.

‘मातंग समाजाचा उदय व विकास’ या प्रकरणात मातंग संज्ञेचा अर्थ, जातीचा मूळ पुरुष, धार्मिक इतिहास, मातंग समाजाचे स्थान व प्रथा-परंपरा, बोलीभाषा, विवाहपद्धती, स्त्रीजीवन, सांस्कृतिक स्थिती यावर प्रकाश टाकला आहे. १९२० पासून मातंग समाजात सामाजिक सुधारणेचे वारे वाहू लागले, असा उल्लेख करत समाज सुधारणा चळवळीचा आढावा घेताना समाजसुधारकांचे कार्य, समाजातील शैक्षणिक व सामाजिक, राजकीय स्थिती याची माहिती दिली आहे. मातंग समाजाची सद्य:स्थिती, समस्या व उपाय याचीही चर्चा केली आहे.

प्रकाशक :
अरुणा प्रकाशन, लातूर
पाने : २५६
किंमत : २४० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
nagnath jaywant manure About 233 Days ago
i want this book 9960132120
0
0

Select Language
Share Link
 
Search