Next
पळशी येथे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा
BOI
Thursday, April 25, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

पळशी येथील ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्ताने आयोजित कुस्ती स्पर्धेत कुस्ती लावताना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी.

सोलापूर : पळशी (ता. पंढरपूर) गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धा, भेदीक व पोवाडे गायन, अखंड हरिनाम सप्ताह अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मल्लांनी हजेरी लावली असून, २५ वर्षांहून अधिक वर्षांची कुस्ती फडाची परंपरा असणाऱ्या या स्पर्धांमध्ये १०० रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते पैलवान उमेश चव्हाण (खवासपूर तालीम) विरुद्ध पैलवान श्रीनिवास मसुगडे (शिवनेरी तालीम, अकलूज) या दोन मल्लांमध्ये लावलेली ५१ हजार रुपयांची कुस्ती सर्वांच्या आकर्षणाचा विषय होती. यात उमेश चव्हाण विजयी झाला. त्याने श्रीनिवास मसुगडे यास एक चाक डावावर चितपट केले.

स्पर्धेमधील २१ हजार रुपयांची दुसरी कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाड (शिरशी तालीम) विरुद्ध पैलवान भैया खरात (खुडूस तालीम) या दोन मल्लांमध्ये रंगली. यात पहिलवान महेंद्र गायकवाडने घुटना डावावरती भैया खरात यास नमविले. स्पर्धेमधील तिसरी मोठी इनामी कुस्ती ११ हजारांसाठी पैलवान अक्षय बोडरे (निमगाव) विरुद्ध पैलवान महेश आटकळे (पंढरपूर तालीम) या दोन मल्लांमध्ये रंगली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ चाललेल्या या कुस्तीमध्ये दोन्ही मल्लांनी तोडीस तोड टक्कर दिली. दोन्ही मल्लांपैकी एकही मल्ल मागे हटण्यास तयार नसल्याने पंचांना ही कुस्ती बरोबरीत सोडवावी लागली. 

२००हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवलेल्या या कुस्ती स्पर्धांमध्ये १००हून अधिक कुस्त्या लावण्यात आल्या. त्यासाठी दीड लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून पैलवान मारुती झांबरे, सुरेश झांबरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी, त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम, श्रीराम ताटे, प्रवीण सावंत, नितीन चवरे, नितीन डाकवाले यांचे पळशी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. 

या प्रसंगी प्रा. सोमनाथ झांबरे, प्रा. परमेश्वर झांबरे, माजी सरपंच रघुनाथ झांबरे, सचिन झांबरे, नवनाथ झांबरे, तानाजी झांबरे, सागर झांबरे, सत्यवान झांबरे, सिद्धेश्वर झांबरे, सुरेश झांबरे आदी उपस्थित होते. ही यात्रा सात दिवस चालणार असून, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्येष्ठ नागरिक व वारकरी सांप्रदायातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आह
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search