Next
‘टाटा पॉवर’तर्फे स्त्रियांसाठी ग्राहक संबंध केंद्र
प्रेस रिलीज
Wednesday, August 01, 2018 | 12:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपनीने ऊर्जा ग्राहकांसाठीच्या देशातील पहिल्या ‘केवळ स्त्रियांच्या’ ग्राहक संबंध केंद्राचे (सीआरसी) उद्‌घाटन केले. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील या सीआरसीचे संपूर्ण व्यवस्थापन सात स्त्रियांचे एक पथक करेल. या स्त्रियांना ग्राहकसेवेची सर्व अंगे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज, मासिक बिलांची पूर्ती आणि ग्राहकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासह ग्राहकांशी संबंधित सर्व सेवांचा समावेश आहे. ‘सीआरसी’ची सुरक्षेसह सर्व कार्ये स्त्रियाच हाताळणार आहेत.

ऊर्जाक्षेत्रात स्त्रियांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी खुल्या करण्यासोबतच कंपनीच्या वाढत्या प्रमाणात वैविध्यपूर्ण होत जाणाऱ्या ग्राहकवर्गाला सेवा देणे हाही उद्देश या मागे आहे. स्त्री ग्राहकांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी केवळ स्त्रियांचे सीआरसी हे कंपनीचे पहिले मोठे पाऊल आहे. एका पूर्ण क्षमतेच्या ग्राहक संबंध केंद्राचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन व कार्यान्वयन करणे हे कंपनीतील स्त्री कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमता दाखवून देण्यासाठी मिळालेले आदर्श व्यासपीठ आहे.

टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘भारतातील अन्य काही पायाभूत सुविधांवर आधारित व्यवसायांप्रमाणेच ऊर्जावापर (पॉवर युटिलिटी) क्षेत्रातही स्त्रियांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे. आवश्यक ते प्रशिक्षण मिळाल्यास स्त्रियांची या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील भूमिका खूपच सुधारू शकते, यावर आमचा विश्वास आहे आणि अशा प्रकारचे केवळ स्त्रियांचे केंद्र आम्हाला आमच्या महिला ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचण्यातही मदत करेल.’

‘सात सुप्रशिक्षित स्त्रिया चालवत असलेले अंधेरी (पश्चिम) येथील आमचे सीआरसी उद्योगासाठी एक नवीन मानक स्थापन करेल आणि त्याच्या विस्तारासाठी बाकीचेही मदत करतील, अशी आशा वाटते. ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांना सामोरे जाण्याच्या विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांतही स्त्रियांचा सहभाग अधिक भक्कम करण्यासाठी टाटा पॉवर सक्रियपणे काम करत राहीलच,’ असे सिन्हा यांनी सांगितले.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link