Next
भांडारकर संस्थेतर्फे दुर्मिळ पुस्तके ऑनलाइन
‘इ लायब्ररी’वर हजार पुस्तके उपलब्ध
BOI
Monday, December 24, 2018 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने कला, तत्त्वज्ञान, इतिहास, पुरातत्वशास्त्र यांसह अनेक विषयांवरील संस्कृत, प्राकृत, पाली भाषांमधील एक हजार दुर्मिळ पुस्तके आता ऑनलाइन वाचण्यास उपलब्ध केली आहेत. गेली दोन वर्षे राबविण्यात येत असलेल्या पुस्तके डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पूर्ण झाला असून, डिजिटायझेशन पूर्ण झालेली हजार पुस्तके आता संस्थेच्या संकेतस्थळावर इ-लायब्ररीच्या स्वरूपात वाचण्यास ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थेच्या borilib.com या संकेतस्थळावर जाऊन ही पुस्तके विनामूल्य वाचता येतील.

या इ-लायब्ररीचे उद्घाटन  नुकतेच मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते  झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रय पाष्टे, भूपाल पटवर्धन, प्रदीप रावत, राहुल सोलापूरकर, मिथिलेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘वेरूळ-एक अद्भूत शिल्प’ विषयावर देगलूरकर यांचे व्याख्यानही झाले.

तसेच या वेळी संस्थेतर्फे पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या टाटा सभागृहामध्ये २६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यामध्ये सुमारे पाच हजार पुस्तकांसह अनेक दुर्मिळ पुस्तकांचा समावेश आहे. 

या वेळी बोलताना मिरासदार यांनी प्राच्याविद्येच्या संदर्भात लोकमान्य टिळक यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘टिळकांचे प्राच्याविद्येतील ज्ञान अगाध होते. अभ्यास मोठा होता. त्याकाळी ‘प्राच्यविद्येचे अधिक ज्ञान कुणाचे? टिळकांचे की भांडारकरांचे?’असा वाद निर्माण झाला होता. अनुयायांनी थेट टिळकांनाच हा प्रश्न विचारला. या वेळी टिळक म्हणाले, ‘प्राच्यविद्येमध्ये मला कधीही काही अडते, तेव्हा मी त्या शंकेचे निरसन भांडारकरांकडून करून घेतो...’ यानंतर अर्थातच हा वाद मिटला आणि भांडारकरांची योग्यताही सर्वांना कळून चुकली.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 13 Days ago
Excellent news. Hope , many will take advantage . Best wishes
0
0

Select Language
Share Link
 
Search