Next
चंद्रकांत काकोडकर
BOI
Wednesday, March 21, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

शृंगारिक लेखनाबद्दल प्रसिद्ध असणारे चंद्रकांत काकोडकर यांचा २१ मार्च हा जन्मदिन. आजच्या दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
२१ मार्च १९२१ रोजी जन्मलेले चंद्रकांत काकोडकर हे शृंगारिक लेखनाबद्दल प्रसिद्ध असणारे कादंबरीकार. त्यांनी राजाराम राजे या नायकावर आधारित रंजक रहस्यकथाही लिहिल्या होत्या. आपल्या काळाच्या मानाने अश्लील वाटेल असं लेखन करणारे काकोडकर आपल्या परीने लिहीतच राहिले होते. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या ‘श्यामा’ या शिक्षकाच्या जीवनावरच्या कादंबरीवर तर पुढे अश्लीलतेचा खटला भरला गेला होता. ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी काकोडकरांना पाठिंबा दर्शवला होता. सर्वोच्च्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. 

श्यामा, देवाघरचे ज्ञात कुणाला?, अमर प्रेम, भैरवी, अभिमान, अनुराग, अपघात, आसावरी, बळी, दानत, फिरून भेटशील का?, हॉटेल लव्हिना, जादूगारा सांग मी तुला कशी भाळले?, जागृती, जाळ्यात गावला मासा, खोड झिजे चंदनाचे, मला जगायचं आहे, नच सुंदरी करू कोपा, सापळा, तेजस्विता, वेदना - अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.

२३ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link