Next
गुंतवून ठेवणारा प्रभावी कथासंग्रह
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Wednesday, March 28, 2018 | 11:35 AM
15 0 0
Share this story

इंजिनीअर असणाऱ्या विजय बेडेकरांनी ‘टाटा मोटर्स’मधून सीनिअर जनरल मॅनेजर पदावरून निवृत्ती स्वीकारल्यानंतर आपल्या ११ कथांचा ‘परफेक्ट’ हा पहिलाच संग्रह अलीकडेच प्रसिद्ध केला. या संग्रहातल्या दर्जेदार आणि उत्कंठावर्धक कथा वाचल्यावर रसिक वाचक मनोमनी नक्कीच म्हणतील, की बेडेकरांनी यापुढे पुष्कळ लेखन करायला हवं!... या कथासंग्रहाचा हा परिचय...
......
शाळकरी वयापासूनच आपल्या अंगात एक लेखक दडलेला आहे हे माहीत असूनही ‘टेल्को’मधल्या (टाटा मोटर्स) जबाबदारीच्या कामात व्यग्र राहिल्यामुळे विजय बेडेकरांच्या हातून म्हणावं तितकं लेखन होऊ शकलं नव्हतं; मात्र कंपनीच्या ‘कथासागर’ दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांमधल्या त्यांच्या सात कथा आणि काही नैमित्तिक कारणांनी त्यांनी लिहिलेल्या चार कथा अशा एकूण ११ कथांचा काहीसा उशिरा प्रसिद्ध झालेला ‘परफेक्ट’ नावाचा कथासंग्रह त्यांच्यामधल्या सर्जनशीलतेचा प्रत्यय देतो. 

बेडेकरांच्या बहुतेक कथांमधून प्रामुख्याने मानवी स्वभावातले भलेबुरे कंगोरे, परिस्थितीशी चाललेला संघर्ष, माणसांत दडलेली माणुसकी, नियतीचे खेळ आणि त्यानुसार माणसाला करावी लागणारी अॅडजस्टमेंट या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘परफेक्ट’सारखी एक क्राइम स्टोरीसुद्धा आहे. 

काही काही लेखक आपल्या कथांमध्ये प्रचंड प्रमाणात विशेषणं आणि अलंकारिक शब्दांचा भडिमार करताना दिसून येतात. बेडेकरांच्या कथांमध्ये मात्र असा विशेषणांचा भडिमार किंवा अतिरिक्त अलंकारिक भाषेचा वापर आढळत नाही. सहज, सोप्या प्रवाही वाक्यांमधून त्यांच्या कथा उलगडत जातात.

त्यांच्या काही कथांमधून जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे कथांचा होणारा अनपेक्षित आणि क्वचित धक्कातंत्र वापरून केलेला शेवट. त्यामुळे कथनामध्ये एक वेगळीच रंगत येते. ‘मी सहस्रबुद्धे’, ‘चकवा’, ‘उद्धार’  या अशाच काही कथा! सरोगसी या आजच्या काळाच्या विषयावरची ‘विजेता’ ही कथाही विषयामुळे वेगळी वाटावी अशी.

एका नव्या लेखकाचा आश्वासक कथासंग्रह असं ‘परफेक्ट’बद्दल नक्कीच म्हणता येईल. 

पुस्तक : परफेक्ट 
लेखक : विजय बेडेकर   
प्रकाशक : विजय बेडेकर, स्प्रिंगफिल्ड्स, कोथरूड, पुणे ४११०३८    
पृष्ठे : १७३  
मूल्य : २०० ₹ 

(‘परफेक्ट’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link