Next
पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी ससूनचे ४२ डॉक्टरांचे पथक रवाना
BOI
Saturday, August 10, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील  पुरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी  अत्यावश्यक औषधे व उपचार साहित्य घेऊन बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील ४२ डॉक्टरांचे पथक रवाना झाले आहे. या पथकात औषधवैद्यकशास्त्र, बालरोग, कान, नाक व घसा, शल्यचिकित्सक, अस्थिव्यंगोपचार, त्वचारोग, नेत्ररोग, जनऔषधवैद्यकशास्त्र  आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा या समावेश आहे.   

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप-अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, सर्व विभागप्रमुख व डॉ. हरीश टाटिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य या वैद्यकीय पथकाला लाभले आहे.  हे ४२ डॉक्टरांचे पथक गरजू रुग्णांची तपासणी करून निदान व औषधोपचार करणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search