Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ची जॉब प्लेसमेंटमध्ये भरारी
प्रेस रिलीज
Friday, March 08, 2019 | 03:15 PM
15 0 0
Share this article:



पुणे : येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत झालेल्या जॉब कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळपास एक हजार ९४५ मुलांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून, अजूनही कॅम्पस प्लेसमेंट चालू आहे. या कॅम्पस प्लेसमेंटमधून दोन हजारांपेक्षा अधिक मुलांना नोकरी मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझंट आणि एटलसकोपकोया कंपन्यांचा सर्वांत मोठा सहभाग आहे. आतापर्यंत मिळालेल्या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वार्षिक पॅकेज १२ लाख रुपयांचे असून, सरासरी पॅकेज ४.१ लाखांचे आहे. प्लेसमेंट झालेल्या एक हजार ९४५ पैकी एक हजार ३३३ मुलांना अक्सेंचर (७७५), इन्फोसिस (२८९), कॉग्निझंटमध्ये (२६९) नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि त्यांचे वार्षिक पॅकेज साडेतीन ते साडेचार लाख एवढे आहे.

‘सिंहगड संस्थेचा औद्योगिक व शैक्षणिक संबंध चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी प्रा. जे. एन .पितांबरे यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे औद्योगिक व शैक्षणिक संबंधामुळे टिकून असून, ‘सिंहगड’चे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट असल्याची बाब आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नमूद केली आहे,’ असे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे यांनी सांगितले.



आत्तापर्यंत झालेले प्लेसमेंट अतिशय समाधानकारक असल्याचे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. पीतांबरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कॅम्पस कनेक्टच्या विस्तृत धोरणामुळे ‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची संख्याही वाढत जाणारी आहे. कॅम्पस कनेक्टच्या धोरणाखाली वेगवेगळे कार्यक्रम सिंहगड इन्स्टिट्यूट घेत आहे जसे की कॉग्निझंट इनोव्हेशन चॅलेंज, टीसीएस कॅम्पस कम्युनिकेशन वेबिनार, ट्रेनिंग प्रोग्राम. याच धोरणामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रभावी मदत होत आहे.’

‘सिंहगड इन्स्टिट्यूट’चे व्हॉइस प्रेसिडेंट-एचआर रोहित नवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. इन्स्टिट्यूटच्या मुलांनी नेहमीच उत्कृष्ट प्लेसमेंट मिळवून सिंहगड संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search