Next
‘जीआयआयएस’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, June 26, 2018 | 03:34 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने (जीआयआयएस) निरोगी जीवन जगण्यासाठी सर्व वयोगटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुणे, बेंगळुरू, नोएडा, इंदोर, अहमदाबाद सूरत येथील सहा संकुलांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. हा सामाजिक उपक्रम शहरातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी खुला होता. योग व त्याचे आरोग्यासाठी फायदे याविषयी जागृती करण्यासाठी पूर्णतः शाळेकडून प्रायोजित असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.

शिक्षणाला नवे आयाम देत आणि विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीवर नाही, तर एकंदर विकासावर भर देत ‘जीआयआयएस’ योगामध्ये शिकण्याला चालना देण्याची, एकाग्रता वाढवण्याची व ताण कमी करण्याची क्षमता आहे, या विश्वासाने विद्यार्थ्यांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये शारीरिक व मानसिक ताणाचे संतुलन साधण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांसाठी योग सत्रे व मेडिटेशन आयोजित करते.

भारतात स्थूलतेचे प्रमाण सातत्याने वाढत असून, आजकाल फिटनेसचा ट्रेंड वाढत आहे; पण शारीरिक फिटनेसबरोबरच मानसिक फिटनेसही गरजेचा असल्याने लहानपणापासूनच रोजच्या जीवनात योगाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. या हेतूने प्रत्येक संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन खास पद्धतीने साजरा करण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केले होते.

पुण्यातील बालेवाडी येथील ‘जीआयआयएस’ने योगाला चालना देण्यासाठी १८ ते २३ जून या कालावधीत ‘यो-ऑन-गो कार्यशाळा’ आयोजित केली होती. पूर्णतः प्रायोजित असलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना योग शिकणे व त्याच वेळी धम्माल करणे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संकुलात ऱ्हिदमिक योग शिकवण्यात आला. सर्व संकुलांमध्ये मोफत योग सत्रे घेण्यात आली. त्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षक उपस्थित होते. सहभागींनी योग करण्याचा आनंद घेतला आणि लहान मुलांनाही सहज करता येतील अशी सोपी आसने केली.

यानिमित्त बोलताना ‘जीआयआयएस’चे डेप्युटी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजीव कट्याल म्हणाले, ‘शिक्षणाप्रती एकात्मिक, सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबून, शिकण्याची प्रक्रिया औपचारिक शिक्षणापलीकडे नेण्याचा व भविष्यातील नेतृत्वाला आकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचे यश केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नाही, तर एकूणच विकासावरही अवलंबून आहे, असे आमच्या पुरस्कार विजेत्या नाइन जेम्स मॉडेलचे मत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक व शारीरिक फिटनेस वाढीस लागण्यासाठी योगावर भर देणे अतिशय आवश्यक आहे. योगविषयी जागृती निर्माण करणे व सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्याचे आरोग्याला असलेले फायदे समजून सांगणे, हे आमचे उद्दिष्ट होते. जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करण्यासाठी या उपक्रमामुळे मदत झाली असावी, अशी आमची अपेक्षा आहे.’

‘जीआयआयएस’ने नामवंत रुग्णालयांच्या सहयोगाने इंदोर व बेंगळुरू येथील संकुलांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘जीआयआयएस’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्याही पालकांसह अंदाजे ३०० पालक व तीन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search