Next
मीरा निलाखे ‘सूर नवा ध्यास नवा’च्या अंतिम फेरीत
BOI
Tuesday, December 18 | 12:43 PM
15 0 0
Share this story

साखरपा : सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ या गायनाच्या रिअॅलिटी शोमध्ये येथील कोंडगावची (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) नात मीरा राहुल निलाखे ही सहभागी झाली असून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.   

सांगलीची सुकन्या असलेल्या मीरा हिची आई संपदा निलाखे (पूर्वाश्रमीच्या संपदा हळबे) यांचे कोंडगाव येथे माहेर आहे. तिचे आजी-आजोबा, मामा-मामी येथे वास्तव्यास असून, आपल्या नातीने रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याने ते आनंदित आहेत. हा शो सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जातो.

मीरा सध्या सांगली येथे दहावीत शिक्षण घेत असून, ती आठ वर्षांची असल्यापासून पराग जोशी यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे धडे गिरवत आहे. तिचे वडील राहुल निलाखे सांगलीतील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक असून, तिची आई संपदा यांना गायनाची विशेष आवड आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रारंभी त्यांचा रियाज सुरू असताना लहानगी मीराही त्यांच्या रियाजात सामील होत असे. हे बाळकडू घेत मोठी झालेल्या मीरामधील गुणवत्ता हेरत तिच्या आई-वडिलांनी तिला संगीत शिक्षक जोशी यांच्याकडे पाठविण्यास सुरुवात केली. गेली सात वर्षे ती संगीताचे शिक्षण घेत आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होती. कोल्हापूर केंद्रावरून मीरा यात सहभागी झाली होती. यात तिची निवड झाली. महाराष्ट्रातील विविध केंद्रावरून निवडण्यात आलेल्या सुमारे सहा हजार मुलांची मुंबई येथे मेगा ऑडिशन घेण्यात आली. त्यातून ५५ मुलांची निवड करण्यात आली. या मुलांची मेगा ऑडिशन घेत २१ अंतिम स्पर्धक निवडण्यात आले. यात १३ मुले परीक्षकांमार्फत, तर स्टँड बाय घेऊन आठ मुले निवडण्यात आली. या २१ मुलांमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ हा किताब पटकाविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.

आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, या स्पर्धेत ‘टॉप सिक्स’ची नुकतीच निवड करण्यात आली. यातही मीराने आपल्या गायन कौशल्याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेचा निकाल २४ डिसेंबर २०१८ रोजी लागेल.

‘१८ डिसेंबरपासून आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करता येणार असून, पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव स्पर्धक आणि साखरप्याची नात असलेल्या मीराला मतदानरूपी आशीर्वाद भरभरून द्यावा आणि तिला या स्पर्धेची विजेती करावे,’ असे आवाहन संपदा आणि राहुल निलाखे यांसह हळबे परिवाराकडून करण्यात आले आहे.

(साखरपा येथे रामनवमीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात गाणे सादर करणाऱ्या मीरा निलाखेचा व्हिडिओ सोबत देत आहोत. )


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahendra Ramane About 24 Days ago
all the best Meera we proud to be Sakharpa Kar
0
0
Mahendra Ramane About 24 Days ago
We proud be be Sakharpa Kar All The Best Meera
0
0
pranali About 24 Days ago
Super se uper lay bhari khupch mst
1
0
P.G.Kulkarni About 28 Days ago
Best wishes for final. Your voice is very good.
1
0
Narendra Mukund Paradkar About 28 Days ago
Very nice Meera, Congratulations. Best wishes for final round .
1
0
Ramesh gogate About 28 Days ago
khup sunder best of luck
1
0
Yashwant ramchandra sawant About 30 Days ago
खूप छान तुला खूप खूप शुभेच्छा
1
0
Ashutosh Anil Sardesai About 30 Days ago
All the best Meera for the future!!!
0
0
Mrs Netra Niranjan Ingole About 30 Days ago
खुप खुप सुंदर, खुप खुप शुभेच्छा.
0
0

Select Language
Share Link