Next
भारतातील एक तृतीयांश लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 02:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली आणि स्पोर्टसवेअर ब्रँड प्युमा यांनी कंतार आयएमआरबी या मार्केट रिसर्च एजन्सीच्या समन्वयाने भारतभरात व्यायाम आणि क्रीडा प्रकारांच्या अंगीकाराच्या विद्यमान परिस्थितीचा अभ्यास केला. या सर्वेक्षणात १/३ लोकसंख्येने मागील एका वर्षात काहीही व्यायाम केलेला नसल्याचे निदर्शनास आले.

या सर्वेक्षणात पुण्‍यामध्‍ये याबाबत चांगली प्रगती दिसून आली. पुण्‍याच्या लोकसंख्येतील सर्वेक्षण केलेल्या ५२ टक्के जनतेने मागील एका वर्षात कोणताही खेळ खेळलेला नाही. ८९ टक्के लोकांनी फक्त शाळा किंवा कॉलेजमध्ये शेवटचे खेळ खेळले आहेत. खेळ न खेळणाऱ्या ५८ टक्के लोकांनी त्याचे मुख्य कारण वेळेचा अभाव हे दिले. हेच लोक सुमारे चार ते पाच तास सोशल मिडीया, टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे आणि विविध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर रोज वेळ घालवतात. खेळायला आवडणाऱ्या ८१ टक्के लोकांनी आपल्याला आवडते म्हणून खेळतो, असे सांगितले. खेळण्याची इतर कारणे म्हणजे तंदुरूस्त राहणे आणि ताणतणावापासून मुक्ती ही आहेत. या संचातील ७६ टक्के लोक आपल्याला मिळणाऱ्या मोकळ्या जागेत खेळतात आणि ६५ टक्के लोक शेजाऱ्यांसोबत खेळतात. या दोन्हींमधून हे स्पष्ट दिसते की सुविधांचा अभाव किंवा खेळायला सोबतीच्या लोकांची कमतरता या गोष्टी खेळण्यातील अडथळा ठरल्या नाहीत.

गोव्यामध्ये ८९ टक्के लोक मागील एका महिन्यात किमान एकदा तरी खेळ खेळले असून, यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ हैदराबाद आणि मुंबई ही शहरे होती. पुणे या यादीमध्‍ये आठव्‍या स्‍थानावर आहे. गुरगाव, रायपूर आणि पाटणा ही शहरे या यादीत अत्यंत खालच्या स्थानावर होती आणि येथे फक्त १८ टक्के, १५ टक्के आणि १२ टक्के प्रतिसादक मागील एका महिन्यात एक तरी खेळ खेळले आहेत.

या निष्कर्षांबाबत बोलताना विराट कोहली म्हणाले, ‘देशाच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येने मागील एक वर्षात कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम केलेले नाहीत ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. तुम्ही शारीरिकदृष्टया तंदुरूस्त असता तेव्हा तुम्ही कोणत्याही स्वरूपाची आव्हाने घेण्यासाठी तयार असता. मी हे वैयक्तिकरित्या अनुभवले आहे आणि त्यामुळेच मी एक कार्यक्षम जीवनशैली अनुभवतो आहे.’

‘आपल्या आयुष्यात तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाला आरोग्य आणि फिटनेसच्या तुलनेत प्राधान्य मिळते आहे, हे बदलले पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात खेळाला सहजपणे समाविष्ट करू शकतो. आपण कुठेही आणि कधीही खेळू शकतो. त्यामुळे मी सर्वांना बाहेर येऊन खेळायचे आवाहन करतो. त्यातून मनोरंजन होईल, ताण कमी होईल आणि आपल्याला तंदुरूस्त राहण्यास मदत होईल.’

प्युमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली म्हणाले, ‘या सर्वेक्षणातून भारताच्या शारीरिक व्यायामाच्या अंगीकाराबाबत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण योग्य पावले उचलली पाहिजेत. खेळ खेळणे ही एक सोपी आणि परिणामकारक उपाययोजना आहे जी आपल्या रोजच्या आयुष्यात आणता येईल. आम्ही कायमच देशात एका कार्यक्षम जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विराट कोहलीने भारताला अधिक तंदुरूस्त बनवण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि आम्हाला या प्रवासात त्याच्यासोबत सहभागी होताना खूप आनंद होत आहे.’

या सर्वेक्षणात १८-४० वर्षे वयोगटातील सुमारे तीन हजार ९२४ प्रतिसादकांचा (पुरूष आणि स्त्रिया) समावेश होता. हे सर्व्हेक्षण बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकाता, कोचीन, गाझियाबाद, गोवा, गुरूग्राम, गुवाहाटी, जयपूर, लखनौ, लुधियाना, पाटणा, रायपूर आणि सुरत या १८ शहरांमध्ये झाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link