Next
शिवाजी विद्यापीठात समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे लाँचिंग करताना प्र-कुलगुरू डॉ. डी .टी. शिर्के.कोल्हापूर : ‘आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वतंत्र वेबसाइट निर्माण करून त्याद्वारे नोंदणी करण्याचा समाजशास्त्र अधिविभागाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य स्वरूपाचा आहे. यातून विद्यापीठाबरोबरच अधिविभागाची जगभरातील समाजशास्त्रज्ञांमध्ये उत्तम प्रतिमानिर्मिती होईल,’ असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागामार्फत १० ते १२ डिसेंबर २०१९ या कालावधीत ‘सोसायटी : रिकन्स्ट्रक्शन, रिफ्लेक्शन अँड रिस्पॉन्सिबीलिटीज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या नोंदणीसाठी ‘एसआरआरआर डॉट इन’ (srrr.in) या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून, या संकेतस्थळाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पाच जुलैला झाले. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात या संकेतस्थळाच्या लाँचिंगचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. शेजारी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. जगन कराडेडॉ. शिर्के म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून समाजशास्त्र विषयातील जागतिक स्तरावरील विचारवंत, प्रज्ञावंत, शास्त्रज्ञ, अभ्यासक यांच्यात विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. विद्यापीठासाठी ही अत्यंत महत्त्वाची पर्वणी आहे. स्थानिक संशोधकांना या परिषदेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.’

अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनीही विशेष वेबसाइट निर्मितीच्या उपक्रमाचे स्वागत करून इतर विभागांसाठीही हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे सांगितले.

‘कोल्हापूर येथील ‘मीडियाटेक’च्या वतीने या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सुमारे २५ देशांतील समाजशास्त्रज्ञ व विचारवंत उपस्थित राहतील आणि त्यांच्या सहभागामुळे या परिषदेचा दर्जा हा अत्यंत वरचा राहील,’ असे समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

यावेळी डॉ. आर. बी. पाटील, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. के. व्ही. मारूलकर, डॉ. एच. एम. ठकार, डॉ. व्ही. बी. ककडे, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. पी. एम. माने, राजेश शिंदे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search