Next
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे दोन जूनला कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ६३व्या वाढदिवसानिमित्त बुद्धपूजा, प्रकाशन आणि अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दोन जून २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पिंपळे गुरव येथील बंधुता भवनमध्ये होईल. 

‘बौद्धाचार्य प्रकाश गायकवाड आणि राजेंद्र कांबळे गुरुजी यांच्या हस्ते बुद्धरूपाची महापूजा, ‘पवनेचा प्रवाह’ या विशेषांकाचे प्रकाशन आणि अभिष्टचिंतन समारंभ होणार आहे. या वेळी ज्येष्ठ विचारवंत आणि प्रसिद्ध व्याख्याते प्रा. तेज निवळीकर, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थाचे संस्थापक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, सातारा रयत शिक्षण संस्थाचे ऑडिटर प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, पाचवे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, कवी अनिल दीक्षित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत,’ अशी माहिती बंधुता परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे यांनी दिली.’ 

कार्यक्रमाविषयी :
दिवस : दोन जून २०१९
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता 
स्थळ : बंधुता भवन, पिंपळे गुरव, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search