Next
‘टीटीए’ला कौशल्‍य शिक्षणात नावीन्य पुरस्‍कार
प्रेस रिलीज
Friday, May 25 | 05:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवी दिल्‍ली येथील आठव्या इंडियन एज्‍युकेशन काँग्रेस मेळाव्यामध्ये अनेक गटांसाठी, विविध शैक्षणिक ब्रॅंड्सना पुरस्‍कार प्रदान करण्यात आले. देशातील सर्व शैक्षणिक संस्‍थांचा सृजनशील मेळावा म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या या मेळाव्यामध्ये, अद्वितीय कामगिरीसाठी, टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमी (टीटीए) यांनी ‘कौशल्‍य शिक्षणात नावीन्य’ हा पुरस्‍कार पटकावला.  

विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करणारी ‘टीटीए’ ही पुरस्‍कार विजेती अग्रगण्य अकादमी, उद्योगपती आणि लेखक अमित अग्रवाल यांनी स्‍थापन केली आहे. अमित अग्रवाल यांच्यासह ‘टीटीए’चे अध्यापकीय संचालक हर्षद सांगळे यांनी हा पुरस्‍कार स्‍वीकारला.  

हा पुरस्कार स्‍वीकारताना अग्रवाल म्हणाले, ‘डिजिटल माध्यम या शब्‍दाने सर्व उद्योगांचे लक्ष वेधले असल्‍याने, शिक्षण उद्योगानेदेखील डिजिटल व्यासपीठाचा अंगिकार करणे अनिवार्य झाले आहे. शिक्षण जास्‍तीत जास्‍त जणांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, ‘टीटीए’ने आपल्‍या विद्यार्थ्यांना अगोदरच इंटरॅक्‍टिव्ह मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे ई-शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अनुभवात्‍मक शिक्षणाची तंत्रज्ञानाबरोबर ‘टीटीए’साठी कशी सांगड घालता येईल याचे आम्‍ही मूल्‍यमापन करीत आहोत.’

‘अजूनही विद्यार्थ्यांचे कौशल्‍य आणि उद्योगाच्या गरजा यामध्ये दरी आहे. केवळ उद्योगाभिमुख अभ्‍यासक्रम प्रदान न करता त्‍यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वपूर्ण विषय त्‍यांच्या अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करून ही दरी भरून काढण्याचा ‘टीटीए’ प्रयत्‍न करीत आहे. प्रमुख विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांनी आयोजित केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून येते की, नोकरीच्या तांत्रिक बाबींच्या अभावामुळे १० टक्क्यांपेक्षा कमी नोकरीत यशस्वी ठरतात. याचा अर्थ असा होतो ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त अपयश हे स्‍वतःबद्‍दलची चुकीची समजूत, इतरांविषयी समजूतीचा अभाव आणि प्रेरणेचा अभाव (थोडक्‍यात जीवन कौशल्‍ये आणि जन कौशल्‍यांचा अभाव) यामुळे असते.  यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म कौशल्‍ये आणि आत्मविश्वास हे अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहेत. युवक आणि व्यावसायिकांना परवडणारे शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘टीटीए’ वचनबद्ध आहे,’ असे अग्रवाल म्हणाले.

विविध शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्‍ती, कॉर्पोरेट, मिडीया एजन्सी, मंत्री, गुंतवणूकदार आदींची आठव्या इंडियन एज्‍युकेशन काँग्रेस परिषदेला उपस्‍थिती लाभली. शिक्षण उद्योगामध्ये तंत्रज्ञान वापराच्या नवीन पद्धती, शिक्षण उद्योगातील अलीकडेच उदयाला आलेले कल, सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्‍ध कसे करता येईल आणि व्हर्चुअल क्‍लासरूम्‍स कसा आवश्यक परिणाम साधू शकतील, अशा विविध मनोरंजक विषयांवर अनेक वेळा चर्चा करण्यात आली.  

फॅशन डिझायनिंग, फॅशन स्टाइलिंग, फॅशन बुटिक व्यवस्‍थापन, अंतर्गत सजावट, अंतर्गत व्यवसाय व्यवस्‍थापन, इव्हेंट व्यवस्‍थापन, अ‍ॅनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, ज्वेलरी डिझाइनिंग आणि फायनान्स अँड अकाऊंटस्‌ असे अभ्यासक्रम प्रदान करणारी ‘टीटीए’ ही एक प्रमुख व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देणारी शैक्षणिक संस्‍था आहे.

विद्यार्थ्यांना सखोल तांत्रिक ज्ञान देण्याबरोबरच त्‍यांची सूक्ष्म कौशल्‍ये विकसित करणे आणि त्‍यांच्या व्यवसायामध्ये यशस्‍वी होण्यासाठी त्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर ‘टीटीए’ लक्ष केंद्रित करते. गेल्‍या १३ वर्षांमध्ये भारतभरातील आठ केंद्रांमधून सुमारे १२ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘टीटीए’मधून उत्तीर्ण झाले आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link