Next
‘टिक टॅक’चा चार ‘आयपीएल’ टीमशी सहयोग
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : देशात क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा सुरू होण्याचे वेध लागलेले असताना, ‘टिक टॅक’ या फरेरो इंडियाच्या आघाडीच्या कॉन्फेक्शनरी ब्रँडने दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स पंजाब, मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद या चार सक्षम टीमचे ‘अधिकृत चीअलरीडर्स’ म्हणून सहयोग करून ‘आयपीएल’च्या लाटेमध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे.

क्रिकेटच्या या स्पर्धेची कमालीची लोकप्रियता विचारात घेता, ‘टिक टॅक’ने उत्साह साजरा करण्यासाठी व तरुणांना त्यांच्या आवडत्या टीमला प्रोत्साहन देण्यास उत्तेजन देण्यासाठी चाहत्यांसाठी ‘#SharetheCheer’ मोहीम जाहीर केली आहे. तरुण भारताशी साधर्म्य असलेला ब्रँड म्हणून ‘टिक टॅक’ आयुष्यातले लहान लहान प्रसंगही जपण्याचा प्रयत्न करते आणि ही मोहीम केवळ मैदानात उपस्थित क्रिकेटप्रेमींचा उत्साह, जल्लोष व क्रिकेटप्रेम यापुरती मर्यादित नसून, प्रत्येक घरासाठी आहे व त्यामुळेच ती देशव्यापी असणार आहे. प्रत्येक भारतीयामध्ये प्रचंड उत्साह आहे व ‘#SharetheCheer’च्या निमित्ताने या उत्साहाला उत्तेजन देण्याचा व संपूर्ण देशाला एकत्र आणेल, असे व्यासपीठ देण्याचा ‘टिक टॅक’चा प्रयत्न आहे.

या सहयोगाविषयी बोलताना ‘फरेरो’चे कंपनी प्रवक्ते म्हणाले, ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स पंजाब, मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद या चार सक्षम टीमचे अधिकृत चीअलरीडर्स म्हणून सहयोग करून इंडियन प्रीमिअर लीग २०१८चा एक भाग बनण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. एक ब्रँड म्हणून विविध माध्यमांतून आजच्या तरुणांच्या जीवनामध्ये स्थान मिळवणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. या पिढीला एखाद्या गोष्टीचा लगेच कंटाळा येतो. म्हणूनच ‘टिक टॅक’ त्यांच्या दैनंदिन जीवनात वैविध्य व धमाल आणण्यासाठी नावीन्यपूर्ण पर्याय शोधत असते. ही मोहीम ‘आयपीएल’च्या लोकप्रियतेवर आधारित आहे व ‘टिक टॅक’ने ज्या चार टीमबरोबर सहयोग केल्या आहे, त्यामार्फत ‘आयपीएल’चा संपूर्ण आनंद दिला जाणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link