Next
घरकुल योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही
नगराध्यक्ष कुणाल राठोड यांची ग्वाही
BOI
Friday, December 07, 2018 | 12:05 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील चार कोटी ८६ लाख रुपयांचा निधी हिमायतनगर नगरपंचायतीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी दिली. त्यामुळे शहरातील कोणीही घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राठोड यांनी दिली. 

शहरातील नागरिकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर करण्यात आली. त्या योजनेचा निधी नगरपंचायतीला मंजूर होण्यासा नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमला हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचे सहकार्य लाभले, असे राठोड यांनी सांगितले. 

कुणाल राठोडहिमायतनगर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतून काही महिन्यांपूर्वी १२१५ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. नगर पंचायतीमध्ये नव्याने सत्तेत आलेले नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो. जावेद भाई, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, प्रभाकरअण्णा मुधोळकर, अन्वर खान पठाण, सरदार खान पठाण, सदाशिव सातव, गुफरान भाई, सावन डाके, विनायक मेंडके, ज्ञानेश्वर शिंदे या टीमचे शहरवासीयांना, गोरगरिबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालू होते. नगरपंचायतीच्या खात्यामध्ये निधीपैकी चार कोटी ८६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जमा झाल्याचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Fahad khan About 136 Days ago
9421766880 Verigood
1
1

Select Language
Share Link
 
Search